spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गिरगावात झळकले तेजस ठाकरेंचं पोस्टर; आजची शांतता, उद्याचं वादळ, चर्चेला आले उधाण

काही दिवसांपूर्वी राज्यातील शिवसेना पक्षात अभूतपूर्व बंड झाला. राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली तब्बल ४० आमदारांनी बंड केला.

काही दिवसांपूर्वी राज्यातील शिवसेना पक्षात अभूतपूर्व बंड झाला. राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली तब्बल ४० आमदारांनी बंड केला. शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेमध्ये ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) असे दोन गट तयार झाले. या बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष कोणाचा असा वाद निर्माण झाला. त्यांचा हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील गटातील शिवसैनिकांनी मुंबईतील गिरगावात एक पोस्टर लावले आहे. आणि सध्या या पोस्टरची चर्चा हि मोठ्या प्रमाणात होत आहे. राजकीय वर्तुळात देखील चर्चाना उधाण आलं आहे. तर हे पोस्टर दुसरं कोणाचं नसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिंरजीव तेजस ठाकरे यांचं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच आणखी एक ठाकरेंची एन्ट्री होण्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी लवकरच राजकीय मैदानात उतरावे अशी मागणी युवासेनेनं उद्धव ठाकरेंकडे केली होती. राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होण्याच्या चर्चा सुरू झाली आहेत. ‘तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवावे’ अशी मागणी युवासेनेनं उद्धव ठाकरेंकडे केली होती. तसेच युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरही आपली ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आतपर्यंत जंगलात, दऱ्या खोऱ्यांमध्ये रमणारे तेजस ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात उतरून रोखठोक बोलणार का अशी चर्चा देखील सध्या मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. कदाचित याच पार्श्वभूमीवर मुंबईतील गिरगावात एक पोस्टर लावले आहे. या पोस्टरमध्ये आजची शांतता, उद्याचं वादळ… नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव ठाकरे अश्या आशयाचं पोस्टर लावण्यात आलं आहे. त्यामुळं ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना आता तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एन्ट्रीची प्रतीक्षा असल्याचं या पोस्टरवरुन दिसतंय. तेजस ठाकरे हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे. ७ ऑगस्ट रोजी सामना वृत्तपत्रात त्यांच्या फोटोसह जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती आणि तेजस देखील राजकारणात प्रवेश करणार की नाही याविषयी चर्चा सुरू झाली.

हे ही वाचा:

प्रत्येक भेट ही राजकीयच असेल असं नाही, आंबेडकरांनी केली शिंदेंसोबतच्या भेटीची भूमिका स्पष्ट

त्यात छुपं काय?, शिंदे-आंबेडकर भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

शिंदे आणि आंबेडकर यांच्यात मध्यरात्री गुप्त बैठक, कारण काय?, “ही” युती सुद्धा फुटणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss