Thursday, July 4, 2024

Latest Posts

“पांडुरंगाच्या वारकऱ्यांना” मिळणार अर्थसंकल्पातून महत्त्वाच्या तरतूदी

देहू, आळंदी, आणि पंढरपूर या मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी आणि मोफत औषधोपचार करणार असल्याची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.त्यामुळे पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत वारकऱ्यांची ही वाट आता सुखकर होणार आहे.

राज्याचं २०२४ चं अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit pawar)सादर केलं. त्यात अनेक योजना मांडल्या गेल्या. महायुतीच्या सरकारकडून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केले.सध्या विठू रायाच्या वारीसाठी माऊली वारीत दंग झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांनी वारकऱ्यांसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत आणि वारकऱ्यांसाठी एक आनंदाची घोषणा केली. पण त्या तरतुदी नेमक्या आहेत तरी कोणत्या हे आपण पाहुयात.

अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी शुक्रवारी २८ जून रोजी अर्थसंकल्प सादर केलं.त्यावेळी त्यांनी संत तुकारामांच्या अभंगाने अर्थसंकल्पानला सुरुवात केली.”‘उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, क्षेत्रमहिमे..”या अभंगाने अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठलाच्या दर्शनाला अवघा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या आहेत.

राज्यसरकार ने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात आता वारकऱ्यांसाठी एक आनंदाची अशी बातमी दिली आहे. राज्याचे अर्थमंत्री राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाची सुरुवात विठू नामाच्या गजराने केली आणि वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केले. पंढरपूरच्या वारीला जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी यासाठी युनेस्को कडे मागणी करण्यात आली आहे. तर पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रती दिंडी प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ” निर्मल वारी” साठी ३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहेत.त्याचबरोबर मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या निधीमार्फत देहू, आळंदी, आणि पंढरपूर या मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी आणि मोफत औषधोपचार करणार असल्याची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.त्यामुळे पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत वारकऱ्यांची ही वाट आता सुखकर होणार आहे.

हे ही वाचा

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना.. 

चोपडा बस स्थानकाने पटकावला स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा किताब..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss