Railway Jumbo block : मध्य रेल्वे तब्ब्ल २७ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक

मुंबईकरांसाठी (Mumbai News) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून (दि. १९ नोव्हेंबर २०२२) मध्य रेल्वेवर २७ तासांचा मेगाब्लॉक (Megablock News) घेण्यात येणार आहे.

Railway Jumbo block : मध्य रेल्वे तब्ब्ल २७ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक

मुंबईकरांसाठी (Mumbai News) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून (दि. १९ नोव्हेंबर २०२२) मध्य रेल्वेवर २७ तासांचा मेगाब्लॉक (Megablock News) घेण्यात येणार आहे. सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम (Mumbai Carnac Bridge To Be Demolished) काम सुरु करण्यात येणार आहे. या कामानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील १ हजार ९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाक पुलाच्या (Carnac Bridge) कामासोबत कोपरी पुलाच्या कामासाठीही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

आज म्हणजेच, शुक्रवारी (दि. १८ नोव्हेंबर) रात्री ११ वाजल्यापासून मेगाब्लॉक सुरू होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काही उपनगरीय गाड्या भायखळा ते ठाणे दरम्यान धावतील. रेल्वेनं प्रवाशांना इतर मार्गांवरुन प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई लोकल व्यतिरिक्त, लांब मार्गावरील वाहतूक देखील या मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार आहे.

तसेच गर्डर टाकण्याचे काम शनिवारी-रविवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. या कामामुळे सध्या वापरात असलेल्या दोन्ही बाजूंच्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, रोड ओव्हर ब्रिज (ROB) तोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि भायखळा स्थानकांदरम्यान १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मुख्य मार्गावर २७ तासांच्या मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं शुक्रवारी दिली आहे. रेल्वे प्राधिकरण मोहम्मद अली रोडला पी डी’मेलो रोडला जोडणारा कर्नाक उड्डाणपूलाचं पाडकाम करणार आहे.

दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत बेस्टतर्फे सीएसएमटी, कुलाबा, भायखळा, दादर, वडाळा आदी परिसरात विशेष बस सोडण्यात येणार आहेत. रेल्वेच्या बांधकाम, अभियांत्रिकी, वीज, ऑपरेटिंग, कमर्शियल आणि आरपीएफ अशा सर्व विभागांनी ब्लॉकचे योग्य व्यवस्थापन करावे. पूल तोडण्यासाठीची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. ब्लॉकदरम्यान मेल-एक्स्प्रेस आणि लोकल सेवा सुरळीत राहण्यासाठी त्याबाबतची योग्य आणि नियमित उद्‍घोषणा करावी. मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या शॉर्ट टर्मिनेशनबाबत सर्व प्रवाशांना एसएमएसद्वारे माहिती द्यावी, अशा सूचना महाव्यवस्थापकांनी बैठकीत दिल्या.

महाव्यवस्थापकांच्या सूचना
– मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी हेल्प डेस्कची व्यवस्था करावी
– प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट आणि एमएसआरडीसी यांनी समन्वय साधत बस सोडाव्यात
– सुरक्षेच्या दृष्टीने आरपीएफने जीआरपी आणि राज्य पोलिसांशी समन्वय साधावा
– ब्लॉक कालावधीत विविध स्थानकांवर पोलिस दलांची नियुक्ती करावी

हे ही वाचा :

Morning Tips : शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करा ‘ही’ योगासने

Sanjay Raut : सर्वात मोठी बातमी ! संजय राऊतांचा राहुल गांधींना थेट इशारा; … तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते

जळगावात धक्कादायक प्रकार! भाषण सुरु असतानाच एकनाथ खडसेंच्या हातातून खेचला माईक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version