राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक; अविनाश जाधवांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलिसांनी अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान चारचाकी वाहनांना टोल न भरता मोफत सोडले. यानंतर अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक; अविनाश जाधवांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोलनाक्याच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव मुलुंड टोलनाक्यावर दाखल होऊन टोलशिवाय काही वाहने सोडण्यास सुरुवात केली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान चारचाकी वाहनांना टोल न भरता मोफत सोडले. यानंतर अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध नेत्यांचे व्हिडीओ दाखवून त्यांच्या टोलविषयीच्या भूमिका सांगितल्या. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा समावेश होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर आम्ही टोलनाके जाळून टाकू”, असा इशारा पत्रकार परिषदेत दिला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मनसैनिक मैदानात उतरले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी टोलवाढीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी ५ दिवस उपोषण केले. त्यांनतर, राज ठाकरे यांनी आग्रह केल्यामुले रविवारी ८ ऑक्टोबरला अविनाश जाधव यांनी उपोषण मागे घेतले. “आतापर्यंत आम्ही गांधींचा मार्ग अवलंबला, यासंदर्भात मार्ग न निघाल्यास आम्हाला भगतसिंह यांचा मार्ग अवलंबवावा लागेल,” अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केली होती.

हे ही वाचा: 

अखेर सलमानने त्या फोटोतील मुलीचं गुपित उलगडलं! सलमानची नवी पोस्ट

परळीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी आता २८६ कोटी रुपये मिळणार!, धनंजय मुंडेंनी मानले राज्यसरकारचे आभार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version