आरक्षणविरोधी राहुल गांधी आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा उघड Adv. Ashish Shelar यांचा आरोप

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशि‍ष शेलार (Ashish Shelar) यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर येथील माता रमाबाई नगर मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्‍यात आले.

आरक्षणविरोधी राहुल गांधी आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा उघड Adv. Ashish Shelar यांचा आरोप

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत केलेल्या आरक्षण रद्द करण्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मुंबईच्या वतीने भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजाताई मुंडे (Pankajatai Munde) आणि मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशि‍ष शेलार (Ashish Shelar) यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर येथील माता रमाबाई नगर मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्‍यात आले.

यावेळी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार म्‍हणाले की, “महामानव भारतरत्न परमपूज्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानाच्या विरोधात राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो. राहुल गांधी यांचा आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर उघड झालाय आणि महाराष्ट्राची जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला याचं उत्तर नक्कीच देईल. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानच्या समानतेचा, समान संधीचा, समान न्यायाच्या आधारावर निर्माण केलेल्या संविधानातून आलेलं आमच्या हक्काचं आरक्षण काढून घेतलं पाहिजे अशी भूमिका त्या राहुल गांधींनी परदेशात घेतली हा हिंदुस्थानच्या इतिहासतला काळा दिवस आहे. राहुल गांधी तुमच्यामध्ये हिम्मत होती तर आरक्षण काढून टाकण्याचं वक्तव्य निवडणुकीच्या आधी बोलून दाखवायचं होतं. भारतातल्या जनतेने तुम्हाला सळो की पळो करून दाखवलं असतं. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दोनवेळा पराभव करण्याचं काम आणि पाप कॉंग्रेसने केलंय. संविधानाला नख लावण्याचं काम हा कॉंग्रेसचा वर्षानुवर्षाचा धंदा राहिलाय. संविधानातून निर्माण झालेल्या आरक्षणाला तुम्ही नखं लावायला निघालात. त्‍यामुळे कॉंग्रेसने माफी मागितली पाहिजे,” असेही ते म्‍हणाले.

यावेळी आमदार महिरे कोटेचा, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, प्रभाकर शिंदे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्‍यक्ष शरद कांबळे भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version