spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईकरांना दिलासा, दादर स्टेशनवर सापडलेल्या ‘त्या’ बॅगमध्ये घातक काहीही नसल्याची मध्य रेल्वेने दिली माहिती

मात्र या बॅगची तपासणी करण्यात आली असून त्या बॅगमध्ये घातक काहीही नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आज जरी ३० डिसेंबर असला तरी मुंबईच्या विविध भागात नवीन वर्षाचं स्वागत करण्याची तयारी खूप आधी पासून सुरु झाली आहे. त्यामुळे बोरिवली, वांद्रे आणि दादरसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे आणि अशातच मुंबईकरांच्या खरेदीचं हॉटस्पॉट असणाऱ्या मुंबईतल्या दादर स्टेशनवर काही वेळापूर्वीच एक संशयित बॅग आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र या बॅगची तपासणी करण्यात आली असून त्या बॅगमध्ये घातक काहीही नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा काहीसा दिलासा मिळाला आहे.

जेव्हा मुंबईतल्या दादर स्टेशनवर ही संशयित बॅग आढळली. तेव्हा हि बॅग नक्की कुणाची आहे किंवा या बॅगेत नक्की काय आहे? असे प्रश्न सर्वांचा पडले होते. हि बॅग दिसताच पोलिसांनी यावर तात्काळ ऍक्शन घेतली आणि बॉम्बशोधक पथकाला बोलवण्यात आलं. पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने या बॅगेची तपासणी केली असता संशयास्पद काहीही आढळून आलं नाही.

प्लॅटफॉर्म क्रमांक पाचजवळच्या तिकिट काऊंटरजवळ ही बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मुंबईत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी होते आहे. अनेक लोक मुंबईत फिरायला येत आहेत. अशा सगळ्या वातावरणात दादर स्टेशनवर संशयित बॅग आढळल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या दोन वर्षात करोना असल्याने नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह म्हणावा तसा नव्हता. यंदा मात्र अशी स्थिती नाही.

ANI ने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस ही बॅग ज्या ठिकाणी आढळली तिथे आले. त्यांनी या बॅगची तपासणी केली. यानंतर या बॅगमध्ये काहीही संशयित आढळलं नसल्याचं CPRO मध्य रेल्वे यांनी सांगितलं आहे.

याच वर्षी जून महिन्या ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या गेट क्रमांक २ समोर एक संशयित बॅग आढळली होती. ही बॅग कुणाची आहे हे समजू शकलेलं नव्हतं. मात्र नंतर बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक यांनी या बॅगेची तपासणी केल्यावर ही बॅग रिकामी असल्याचं समोर आलं होतं

हे ही वाचा:

दहावी-बारावीचे वेळापत्रक झाले जाहीर, या तारखेपासून होणार परीक्षेला सुरुवात

राज्याच्या भल्यासाठी काय नवीन आणता येईल, ते पाहा… अजित पवारांनी शिंदेंना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss