spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई आयआयटीमध्ये आयोजित करण्यात आलेले प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे व्याख्यान अचानक रद्द

मुंबईमधील (Mumbai) आयआयटी (IIT) मध्ये प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी (Ganesh Devy) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईमधील (Mumbai) आयआयटी (IIT) मध्ये प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी (Ganesh Devy) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश देवी हे ‘द क्रायसिस इन इंडिया’ या विषयांवर व्याख्यान देणार होते. आयआयटीतील व्याख्यानमालेमधील हे व्याख्यान होते. पण आयोजित करण्यात आलेले हे व्याख्यान अचानक रद्द झाल्याने विद्यार्थी संघटनांनी निषेध दर्शवला आहे. आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कलच्या विद्यार्थी संघटनेकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. व्याख्यानाच्या सामूहिक वाचनासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

३१ जानेवारीला आज प्रख्यात भाषा तज्ज्ञ गणेश देवी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अचानक व्याख्यान रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांना अचानक व्याख्यान रद्द केल्याचे ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे. ‘द क्रायसिस इन इंडिया’ या विषयांवर गणेश देवी व्याख्यान देणार होते. दोन महिने आधीच देवी यांना या व्याख्यानाबद्दल विचारण्यात आले होते. तसेच त्यांचा विषय देखील आधीच ठरला होता. आयआयटीने काही दिवसांपूर्वी व्याख्यानाच्या विषयांवरून होणाऱ्या वादामुळे एका समितीची स्थापना करण्यात आली होती. पण या समितीनेच हे व्याख्यान रद्द केले आहे असे, समितीकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई आयआयटीतील विद्यार्थी बुधवारी देवी यांनी लिहिलेल्या संबंधित व्याख्यानाचे वाचन आयआयटीमध्ये करणार आहेत. आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल या सगळ्या विरोधात तीव्र निषेध करण्यात आला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाच्या वाचनासाठी एकत्र यावे, असे आव्हान देखील करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘जात बघुन मैत्री करणारा तू’….मेघा घाडगेनी केली पुष्कर जोगची कानउघजडणी

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरी ईडी चौकशी, चौकशीनंतर कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss