Republic Day 2023, वामनराव मुरांजन हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडला ७४ वा प्रजासत्ताक दिन

आज ७४ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. यानिमित्ताने देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण हे बघायला मिळत आहे.

Republic Day 2023, वामनराव मुरांजन हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडला ७४ वा प्रजासत्ताक दिन

आज ७४ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. यानिमित्ताने देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण हे बघायला मिळत आहे. २६ जानेवारी हा दिवस भारतासाठी विशेष आहे. याच दिवसापासून भारतात संविधान लागू झालं होतं. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं. भारतासाठी २६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्व आहे. देशातला प्रत्येक नागरिक, मग तो भले कुठल्याही जाती, धर्माचा असो, तो प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना भरलेली आहे. तसेच अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आले आहे. अनेकी शाळांमध्ये देखील प्रजासत्ताक दिन हा मोठ्या उत्सहात पारपडला आहे. असाच उत्साह हा मुलुंडमधील वामनराव मुरांजन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे.

आज ७४ वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुलुंडमधील वामनराव मुरांजन हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या जलोषात पार पडला. सकाळी ठीक ८ वाजता शाळेमध्ये ध्वजवंदन करण्यात आले आहे. आणि यामध्ये विशेष बाब म्हणजे हे ध्वजवंदन सफाई कामगार शबाना शेख, १५ वर्षांपासून शाळेतील ग्रंथालय सांभाळणारे संतोष संत आणि विज्ञान शिक्षक दरश शहा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी कमिटी अध्यक्ष डॉ. आनंद प्रधान, उपाध्यक्ष सुहास काणे, कोषाध्यक्ष व्यकंटेश अय्यर हे देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमात सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. तसेच विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये देशभक्तीपर गीत, त्यासंदर्भात डान्स असे अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. तसेच यावेळी मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत देशाप्रती असलेली भावना देखील व्यक्त केली आहे. तसेच मुलांच्या चेहऱ्यावर देखील देशप्रेमाची भावना हि दिसून येत होती.

हे ही वाचा:

Republic Day 2023, ‘या’ ठिकाणी पार पडले होते ‘प्रजासत्ताक दिना’चे पहिले संचलन

Republic Day 2023, यंदा बनवा तिरंगा स्पेशल केक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version