spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईतील जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर

मुंबईतील (Mumbai) सगळ्यात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या जे जे रुग्णालयातील(J. J Hospital) निवासी डॉक्टरांनी आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी संप आंदोलन सुरु केले आहे.

मुंबईतील (Mumbai) सगळ्यात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या जे जे रुग्णालयातील(J. J Hospital) निवासी डॉक्टरांनी आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी संप आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे ओपीडी पेशंटवर उपचार मिळण्यास अडचणी येणार आहेत. रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. मुंबईतील निवासी डॉक्टरांनी संघटना मार्डने या संपला पाठींबा दिल्याने मुंबईतील रुग्णसेवा खंडित होण्याची शक्यता आहे.

जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संप आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे रुग्ण सेवा खंडित होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाला केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पाठींबा दर्शवला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी असताना निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. याच्यामुळे हजारो रुग्णांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे ओपीडीतील रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी येणार आहेत. मुंबईतील जे.जे.रुग्णालयात सर्वाधिक ओपीडीची ( बाह्य रुग्ण विभाग ) संख्या असते.जे.जे. रुग्णालयातील त्वचा विभागातील निवासी डॉक्टरांनी सामुहिक रजा आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे रुग्णांना अडचणीला सामोरे जावे लागू शकते.

जे.जे.रुग्णालयातील त्वचा विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण कुरा यांच्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. रुग्णांचे मृत्यू , निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ, नापास करण्याची धमकी, सहकारी डॉक्टरांचा सल्ला नाकारणे आणि विभागप्रमुखांकडून सातत्याने होणारा त्रास अशा विविध कारणांमुळे जे.जे. रुग्णालयातील त्वचा विभागाच्या निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जे . जे . रुग्णालय प्रशासनासह वैद्यकीय शिक्षण विभागाकडून विभागप्रमुखांवरील कार्यवाहीबाबत सातत्याने होणारे दुर्लक्ष पाहता मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने या संपाला पाठींबा दिला आहे. या सामूहिक आंदोलनाचा फटका रुग्णांना बसणार आहे.

हे ही वाचा:

IPL 2024, उद्या दुबईत होणाऱ्या लिलावात ७७ खेळाडूंवर खर्च होणार सुमारे २६३ कोटी रुपये

संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss