Sunday, June 30, 2024

Latest Posts

मुंबई मराठी पत्रकार संघावर ‘संदीप चव्हाण’ यांच्या परिवर्तन पॅनलची वर्णी

समर्थ पॅनल तर्फे ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर परिवर्तन पॅनलचे ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण हे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण तब्बल ३१६ मतांनी परिवर्तन पॅनलने आपल्याकडे विजय खेचून घेत समर्थ पॅनलचा पराभव केला. 

अनेक दिवसांपासून मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक सुरु होती. समर्थ पॅनर विरुद्ध परिवर्तन पॅनल असा सामना रंगला होता. मात्र काल झालेल्या चुरशीच्या लढतीत संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला.समर्थ पॅनल तर्फे ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर (Sukrut Khandekar) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर परिवर्तन पॅनलचे ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण(Sandip Chavan) हे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण तब्बल ३१६ मतांनी परिवर्तन पॅनलने आपल्याकडे विजय खेचून घेत समर्थ पॅनलचा पराभव केला.

मुंबई पत्रकार संघावर कोणाचा झेंडा रोवणार यावरुन लढाई सुरु होती. समर्थ पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल या सामन्यात समर्थ पॅनलने १६० मतं मिळाल्याने पराभूत झाला आणि समर्थ पॅनल तर्फे ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या पॅनलच्या पदरात अपयश मिळालं. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक(Uday Tanpathak) हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांच्या विरोधात परिवर्तन पॅनलच्या ज्येष्ठ पत्रकार स्वाती घोसाळकर (Swati ghosalkar) असा सामना रंगला होता. या संपूर्ण निवडणुकीकडे आणि निवडूक कोण जिंकणार याकडे मंत्रालयातील संघातील अनेक माध्यम प्रतिनिधींचे लक्ष लागले होते.पण या लढतीत ज्येष्ठ पत्रकार स्वाती घोसाळकर(Swati ghosalkar) यांच्या पॅनलने २८८ मतं मिळवून बाजी मारली आणि उदय तानपाठक (Uday Tanpathak) यांच्या पदरी २०८ मतं पडली.

या दोन्ही सामन्यानंंतर राजेंद्र हुंजे (Rajendra Hunje) आणि विष्णू सोनवणे (Vishnu Sonawane)यांच्यामध्ये उपाध्यक्षपदावरुन निवडणूक सुरु होती मात्र त्यात राजेंद्र हुंजे(Rajendra Hunje) यांना २२५ मिळाली आणि त्यांनी उपाध्यक्ष पदावर आपलं नाव कोरलं. त्याचबरोबर पत्रकार संघाच्या कार्यवाहपदी ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र शिर्के (Shailendra Shirke) यांचा देखील मोठ्या मतांनी विजय झाला आणि अखेर या संपूर्ण तसेच अटीतटीच्या सामन्यात मुंबई मराठी पत्रकार संघावर संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलची वर्णी लागली.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss