Sandeep Deshpande घेणार आज पत्रकार परिषद, हल्ल्याप्रकरणी तपासाला वेग तर २ जण ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल दि. ३ मार्च रोजी शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांनंतर पोलिसांनी कसून तापन सुरु केला आहे.

Sandeep Deshpande घेणार आज पत्रकार परिषद, हल्ल्याप्रकरणी तपासाला वेग तर २ जण ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल दि. ३ मार्च रोजी शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांनंतर पोलिसांनी कसून तापन सुरु केला आहे. आता त्याच्या हा हल्ल्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. हल्ला करणारे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. परंतु संदीप देशपांडे यांच्या या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोपप्रत्यारोप हे सुरु झाले आहेत. तसेच या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी नुकतेच २ जणांना ताब्यात घेतले आहे. उरलेल्या दोघांचा अजूनही शोध हा सुरु आहे. परंतु या हल्याप्रकरणी मनसे नेत्यांनी थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच आज संदीप देशपांडे हे स्वतः आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या हल्ल्यामागे जे कोणी आहे, त्याची चौकशी करुन आरोपींना कठोरातील कठोर शासन होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंना आश्वासन दिलं आहे. मुंबई पोलिसांकडूनही संदीप देशपांडेंवरील हल्ल्याची कसून चौकशी केली जात आहे. दादर पोलीस स्थानक, शिवाजी पार्क पोलीस स्थानक अशा सर्व जवळच्या पोलीस स्थानकांच्या टीम काल सकाळपासूनच याप्रकरणी तपास करत होत्या.

नेमके काय झाले होते ? –

दि ३ मार्च रोजी सकाळच्या सुमारास संदीप देशपांडे हे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्क येथे गेले होते. मॉर्निंग वॉकच्या दरम्यान त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ला करण्यास आलेले हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. मॉर्निंग वॉक करत असतानाच अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. संदीप देशपांडे हे या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंदुजा रुग्णालयात संदीप देशपांडे यांना भेटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः गेले आहेत. तसेच अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, सदा सरवणकर देखील रुग्णालयात गेले होते.

हे ही वाचा :

मोठी बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडेवर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, जाणून घ्या हेल्थ अपडेट

Women’s Premier League, पहिला सलामी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स

ठामपाच्यावतीने गरजू महिलांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना’ सुरू करावी शिवसेनेची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version