Saturday, July 6, 2024

Latest Posts

Ravindra Waikar घाबरट माणूस आम्हाला काय ज्ञान देतो? Sanjay Raut यांचे टीकास्त्र

शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) नेते संजय राऊत ISanjay Raut) यांनी आज (मंगळवार, १८ जून) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) नेते संजय राऊत ISanjay Raut) यांनी आज (मंगळवार, १८ जून) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘हा घाबरट माणुस पळून गेला, आणि आता ते आम्हा काय ज्ञान देत आहेत?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात (Mumbai North West Constituency) शिवसेना उबाठा गटाचे अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांचा शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी अवघ्या ४८ मतांनी पराभव केला होता.

संजय राऊत यावेळी म्हणाले, “रविंद्र वायकर हे शिवसेनेत होते, ते शिवसेनेतून तीन -चार वेळा बीएमसीचे चेअरमन बनले, आमदार मंत्री बनले आणि आता ईडी आणि सीबीआयला घाबरुन दुसऱ्या पक्षात गेले. आम्ही घाबरलो नाही आम्ही खरे शिवसैनिक आहोत आणि शिवसेना सोडणार नाही, ना जेल ला घाबरलो ना कोणत्या कारवाईला… हा घाबरट माणुस पळून गेला, आणि आता ते आम्हा काय ज्ञान देत आहेत ईव्हीएम बद्दल… त्याच्यावर ईडीची कारवाई चालू आहे ती का थांबले ते त्यांनी सांगावे. आम्ही ईव्हीएम वर आरोप केलेला नाही आम्ही सिस्टीमवर आरोप केला आहे. रविंद्र वायकर लोकसभेपर्यंत नाही पोहचणार.”

काल (सोमवार, १७ जून) शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर रवींद्र वायकर यांनीसुद्धा पत्रकारांशी संवाद साधत शिवसेना उबाठा गटावर निशाणा साधत रडीचा डाव खेळत असल्याचे सांगितले. रवींद्र वायकर यांनी सांगितले, “ईव्हीएम कसे हॅक करता येईल? मला याविषयी काही बोलावसं वाटत नाही. हि निवडणूक पारदर्शकतेने झाली नसेल तर कायदा आहे. मग हिंदुस्थानातील निवडणुकही पारदर्शक झाली नाही. निवडणूक ही पारदर्शकच झाली आहे.. रडीचा डाव आता त्यांनी थांबवावा,” असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा

माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी पेटून उठलो आणि…Kiran Mane यांची नवी पोस्ट चर्चेत

मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम….राष्ट्रवादी शरद पवार गटाचे टीकास्त्र कोणावर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss