मुलाची जागा वाचवली तरी चालेल, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

मुलाची जागा वाचवली तरी चालेल, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या चालीचं झुंप्लायच दिसून येत आहे. रोज काही ना काही तरी आरोप प्रत्यारोप सुरु असतं. तर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात इंडिया टुडे सी-वोटर सर्वेक्षणाची जोरदार चर्चा संपूर्ण देश भरात पाहायला मिळत आहे. ‘मूड ऑफ द नेशन’ (Mood of the Nation) असं या सर्वेचं नाव असून त्यामध्ये आजच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या, तर देशात आणि महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल, यासंदर्भातली आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात शिंदे-फडणवीसांची लोकसभा निवडणुकीत पीछेहाट होऊ शकते असा निष्कर्ष काढण्यात आला असून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) ३४ लोकसभेच्या जागा जिंकण्यात यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी केलेल्या वक्तव्यावर आता संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावताना संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या खासदारकीवरून टोला लगावला आहे. “जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्वे असतात, तेव्हा त्यांना ते हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा (national level) सर्वे भाजपाच्या बाजूने आहे, तो त्यांना हवा आहे. पण महाराष्ट्रातला सर्वे त्यांच्याविरोधात आहे. तो त्यांना नको आहे. त्या सर्वेनुसार मविआला लोकसभेच्या साधारण ३४ जागा मिळतील असा अंदाज आहे. पण आम्ही म्हणतो या जागा साधारण ४० ते ४५ असतील. मुख्यमंत्री म्हणाले की ४-५ जागा मिळाल्या तरी पुरे.माझं म्हणणंय की त्यांनी कल्याण-डोंबिवलीची (Kalyan-Dombivli) जागा जरी वाचवली तरी पुरे”, असं संजय राऊत म्हणाले. , मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना पद्मविभूषण (Padma Vibhushan) पुरस्कार जाहीर करताना तसा पुरस्कार बाळासाहेब ठाकरेंना का जाहीर करण्यात आला नाही? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.”नुसती तैलचित्र (oil painting) लावून किंवा बाळासाहेब ठाकरे आमचे, आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत अशा नुसत्या पिपाण्या वाजवून चालत नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या सर्वेवर प्रतिक्रिया देताना तो विश्वासार्ह नसल्याचा दावा केला आहे. “हा सर्वे वास्तवदर्शी नसून फक्त काही लोकांनी दिलेल्या माहितीवर आधारीत आहे. आमची आघाडी येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व विक्रम मोडीत काढेल. अशा सर्वेंची आम्हाला गरज नाही. असे अनेक सर्वे होत असतात. या सर्वेमधून काहीही स्पष्ट होत नाही”, अशा आशयाचं विधान एकनाथ शिंदेंनी केलं होतं.

हे ही वाचा:

मध्यप्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानाचा भीषण अपघात

आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, ‘वंचित’सोबतच्या आघाडीबाबत पवारांच मोठं वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version