spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

यलो गेटमध्ये घुसलेल्या कारचा शोध, या प्रकरणी तिघांना अटक

मुंबई येथे असलेल्या ईस्टर्न फ्रीवेच्या दक्षिणेकडील टोकाला असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (Mumbai Port Trust) यलो गेटमध्ये (Yellow Gate) शनिवारी रात्री दोनच्या सुमारास एक घुसली होती.

मुंबई येथे असलेल्या ईस्टर्न फ्रीवेच्या दक्षिणेकडील टोकाला असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (Mumbai Port Trust) यलो गेटमध्ये (Yellow Gate) शनिवारी रात्री दोनच्या सुमारास एक घुसली होती. ही कार आतमध्ये गेल्यानंतर तिथे असलेल्या सीआयएसएफ (CISF) जवान दुर्गा हरीराम जैस्वाल यांनी या कारचा पाठलाग केला. त्या कारमध्ये तिघेजण होते. कारचा पाठलाग करत असताना त्यांची सर्व्हिस रायफल त्याच्या गाडीवर आपटली आणि त्यावेळी रायफलचे मॅगझिन, ज्यामध्ये 20 जिवंत काडतुसे होत ते कारमध्ये पडले. त्यांनतर कर पुन्हा युटन घेऊन माहीमच्या दिशेने बाहेर गेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

मुंबईच्या संवेदनशील असलेल्या यल्लो गेटमध्ये एक अज्ञात कार घुसली होती. त्या कारचा मुंबई पोलिसांनी शोध घेतला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी ही कार शोधून काढली.या कारमध्ये असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय या कारमध्ये २० जिवंत काडतुसे (Cartridges) असलेले मॅगझिन देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. गौरेश मोहित वगळ (वय २७ वर्षे), श्रेयस किरण चुरो (वय२५ वर्षे) आणि अभिषेक अजित माणगांवकर (वय २४ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या नंतर या प्रकरणाची सर्व माहिती सीआयएसएफ जवानाने यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून त्यांच्यावर भा.दं.वि. कलम २७९,३३६,४४७,४०३ हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीना पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथक बनवण्यात आली होती.

वाहनाची MH01 CD ही सीरिज आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या कारचा शोध घेतला. दुसरा पर्याय म्हणून राज्य परिवहन विभागातील वरिष्ठांशी संपर्क साधून MH01-CD या सीरिजच्या सर्व यादी प्राप्त मिळवल्या. अशा ऐकून ८६ वाहनांचा अभ्यास आणि सीसीटीव्हीं फुटेजच्या मदतीने ही कार शोधून काढली. सोबतच सीआयएसएफ जवानाच्या सर्व्हिस रायफलच्या मॅगझिनमधून पडलेली 20 जिवंत काडतुसे देखील ताब्यात घेतली.

हे ही वाचा: 

Latest Posts

Don't Miss