ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे (Vishwas Mehendale) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा घेतला आहे.

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे (Vishwas Mehendale) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा घेतला आहे. ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे हे वृत्तनिवेदक, लेखक, अभिनेतेही होते.अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालन त्यांनी केलं होतं त्याचसोबत १८ हुन अधिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे. याव्यतिरिक्त मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जायचे. आज त्याच वृद्धापकाळाने निधन झालं असून मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.

डॉ. विश्वास मेहेंदळे यांची मीडिया संदर्भात कारकीर्द ही एक वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली होती. डॉ. विश्वास मेहेंदळे हे दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक होते. दिल्ली येथील आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक ठरले. तसेच, मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनच्या मुंबई केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिलं. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते.

लोकमान्य टिळक यांच्या संपादकीय लेखांवर संशोधनात्मक प्रबंध लिहून डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी पीएच.डी. मिळवली. तसेच त्यांनी सातारा येथून प्रकाशित होणाऱ्या ‘ऐक्य’ दैनिकाचे संपादक म्हणूनही काम केले आहे. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच, मला भेटलेली माणसे हा त्यांचाय एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला. शिवाय, त्यावेळी दूरदर्शनवर असलेला वाद संवाद हा कार्यक्रम मेहेंदळे यांच्या सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध होता.

सृजन फाउंडेशननं महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं पुण्यात १-३ ऑक्टोबर २०१० या काळात भरविलेल्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी भूषवलं होतं. तसेच, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेच्या पुणे शाखेकडून ‘मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कलाकार’ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

हे ही वाचा:

एकदा अपयशी ठरल्यानंतर दुसरी संधी मिळणं अवघड, बॉडी शेमिंगबद्दल शिल्पा शिरोडकरने केला खुलासा

‘या’ देशामध्ये संसद, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्टात घुसून हजारो नागरिकांनी केली तोडफोड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version