spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शशिकांत वारिसे हे राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खूपत होते, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाली आणि या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झाले आहे. या हत्येमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली.

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाली आणि या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झाले आहे. या हत्येमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. शिंदे – फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लबोल हा केला जात आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्याचे नेते संजय राऊत यांनी देखील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल हा केला आहे.

आज सकाळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळेस बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, “माझ्या माहितीप्रमाणे पत्रकार शशिकांत वारिशे यांनी रिफायनरी येणार म्हणून ज्यांनी भविष्यात विकण्यासाठी कवडीमोल किंमतीत जमिनी घेतल्या, हे जमीनदार कोण आहेत? या संदर्भातील माहिती देण्यास सुरुवात केली होती. रिफायनरी समर्थक, सरकार पक्षातील सध्याचे काही लोक, रत्नागिरीमधील काही राजकारणी, यांचं या प्रकरणात जमिनी घेण्यात कसं परप्रांतीयांबरोबर साटंलोटं आहे. राजापूरात, नाणारच्या आसपास अब्जावधी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार झाले. त्यासंदर्भात शशिकांत वारिशे यांनी बोलायला आणि लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे ते त्याभागातील काही राजकारण्यांच्याही डोळ्यात खूपत होते.”

याचबरोबर “जे पालकमंत्री सध्या आहेत आणि ज्यांनी सुपारी घेतलेली आहे, रिफायनरी आणणारच किंवा तिथले जे केंद्रीयमंत्री आहेत आणि त्यांचं कुटुंबं आहे. काही झालं तरी विरोध मोडून काढून आम्ही रिफायनरी आणणारचं. आगणेवाडीच्या जत्रेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जाहीर सभा घेतली आणि त्या सभेत रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या. रिफायनरी करून दाखवतो, कोण आडवं येतं पाहू. अशाप्रकारची भाषा केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. २४ तास अगोदर राज्याचे गृहमंत्री सांगतात, रिफायनरीला कोण आडवं येतंय ते पाहू आणि दुसऱ्या दिवशी रिफायनरीला आडवा येणारा एक तरूण पत्रकार मारला जातो. याचा काय संबंध लावायचा, हा योगयाग समजायचा की अजून काय समजायचं?” असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

याशिवाय, “या महाराष्ट्रात आणि देशात कालपर्यंत जे आपल्या विरोधात आवाज उठवतील, जे आपल्या विरोधात लिहितील आणि बोलतील, जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांना ईडी, सीबीआय, पोलीस, प्राप्तिकर विभाग अशा यंत्रणांच्या माध्यमातून अडवकवलं जात होतं, तुरुंगात पाठवलं जात होतं आता हे सरकार एक पाऊल पुढे गेलं आहे. आता विरोधात बोलणारे आणि लिहिणाऱ्यांच्या हत्या होऊ लागल्या आहेत. ही या महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. ही गुंडशाही आहे, जी महाराष्ट्रात सुरु झाली आहे.” असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाला भेटण्याची वेळ मिळत नाही आहे. वारंवार वेळ मागूनही वेळ दिली जात नाही. म्हणून आम्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. रिफायनरी समर्थकांनी या ठिकाणी आसपास जमिनी घेतलेल्या आहेत या जमिनी कोणाच्या आहेत याची यादी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. पोलिसांवर दबाव आहे जिल्हाधिकारी आणि रिफायनरी प्रमुखांना आदेश देण्यात आला आहे की जे कोणी विरोध करतील त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवा.

तसेच संजय राऊत पुहे म्हणाले, आज विनायक राऊत आणि राजन साळवे वारसे यांच्या कुटुंबीयांना भेटत आहेत आणि लवकरच आम्ही सुद्धा तेथे जाऊ. आज आमचे नेते हे वारिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील आणि पुढील भूमिका ठरविण्यात येईल. पुढे संजय राऊत म्हणले आहेत की, शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांना तात्काळ ५० लाखांची मदत द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांना करत आहेत. केंद्रीय उपमुख्यमंत्र्यांनी विशेष टीम येथे पाठवावे आणि वारीसे यांचीच नाही तर या आधी झालेल्या चार-पाच हत्यांचा देखील तपास करावा. सरकारने केलेला हा खून आहे. तसेच मला देखील धमक्यांचे फोन आले शशिकांत वारीसे यांचा मुद्दा जर उचललात तर तुमचा शशिकांत वारीसे करू असं देखील यावेळेस संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

Happy Promise Day 2023, आज प्रॉमिस डे च्या निम्मिताने तुमच्या पार्टनरला द्या खास वचन

मोदी – शाह यांच्या दौऱ्यावर शरद पवारांची खोचक टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss