spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MVA जोडे मारो आंदोलनावर ठाम…गेटवे ऑफ इंडियात पोलिसांचा कडक बंदोबस्त

आज हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाही. मात्र तरी मविआच्या आंदोलनाला महायुती आंदोलनातूनच उत्तर देणार आहे. महाविकास आघाडीच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीने आज (दि. १ सप्टेंबर २०२४) रोजी जोडे मारो आंदोलन करणार आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफीसुद्धा मागितली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीने आजच्या आंदोलनावर ठाम आहे. आज मुंबईत सरकारविरोधात महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलन करणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सकाळी १० वाजल्यापासून बंद राहणार आहे. आज हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाही. मात्र तरी मविआच्या आंदोलनाला महायुती आंदोलनातूनच उत्तर देणार आहे. महाविकास आघाडीच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे.

महाविकास आघाडीतर्फे आज जोडे मारा आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या आंदोलनाला आज भाजप आंदोलनातून प्रत्युत्तर देणार आहेत. महाविकासच्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून शिवरायांच्या पुतळ्यासमोर राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात आंदोलन होणार आहे. सिंधुदुर्गात नारायण राणे, रत्नागिरीत रवींद्र चव्हाण, लातूरमधून रावसाहेब दानवे, संभाजीनगरमध्ये अतुल सावें, भागवत कराड, ठाण्यात निरंजन डावखरे, पालघर मधून हेमंत सावरा तर मुंबईत प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन केली जाणार आहेत.

महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. या परिसरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात फौजफाटाही तयार ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss