मोदींच्या सभेसाठी विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी झाले आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod) आज मुंबईत येणार आहेत. आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांना चालना मिळेल.

मोदींच्या सभेसाठी विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी झाले आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod) आज मुंबईत येणार आहेत. आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांना चालना मिळेल. तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन देखील होणार आहे. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत बीकेसी (BKC Ground) मैदानावर एका विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे या सभेत मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं आहे. परंतु दुरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेसाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत ही तोडण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी कितीवेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा प्रश्नही विद्यार्थी संघटनाकडून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच या सर्व संदर्भात बोलताना, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नेते अमोल माटेले म्हणाले, ”कलिना कॅम्पसची भिंत पाडून मुंबई महापालिका आणि विद्यापाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची सुरक्षा धोक्यात आणली आहे. तसेच राजकीय कार्यक्रमांसाठी विद्यापीठाचा कॅम्पस वापरणे कितपीत योग्य आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. याबरोबच युवासेनेही यावर आक्षेप नोंदवला आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येणाऱ्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. मात्र, तरीही महापालिकेने भिंत पाडून रस्ता तयार केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे नेते प्रदीप सावंत यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात डिजीटल पद्धतीने विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्यांसाठी पार्कींगची सुविधा व्हावी, यासाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आल्याने विविध विद्यार्थांंनी आक्षेप घेतला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी किती वेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा संतप्त सवाल देखील विद्यार्थ्यांनी महापालिकेला विचारला आहे.

हे ही वाचा:

मोदींच्या सभेसाठी विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी झाले आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं खास मराठीत ट्विट, मुंबई दौऱ्यासंदर्भात दिली ‘ही’ विशेष माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version