spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Collage Festival, ‘अंतरंग’ फेस्टिवलमध्ये रंगले कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी

सध्या अनेक कॉलेज फेस्टिवलच्या माहोल हा दिसून येत आहे. तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा दिसून येत आहे. असाच उत्साह मुंबईतील दादर (Mumbai, Dadar) मधील कीर्ती कॉलेजमध्ये (Kirti Collage) दिसत आहे.

सध्या अनेक कॉलेज फेस्टिवलच्या माहोल हा दिसून येत आहे. तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा दिसून येत आहे. असाच उत्साह मुंबईतील दादर (Mumbai, Dadar) मधील कीर्ती कॉलेजमध्ये (Kirti Collage) दिसत आहे. कीर्ती कॉलेज हे या वर्षी अनेक नवीन संकल्पना आणि विचार घेऊन आले आहेत. आयुष्यात कोणतंही बंधन नसल्यावर आणि कोणाच्याही दडपणाशिवाय आपण जगाला सामोरं जाऊ शकतो. आपल्यातली कौशल्य अधिक प्रभावीपणे आपण सादर करू शकतो. आणि याच मुद्द्यालाधरून कीर्ती कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाने ( Cultural Department) ‘अंतरंग’ हा फेस्टिव्हलचे (Antrang’ festival)आयोजन केले आहे. हा फेस्टिव्हल १४ जानेवारी २०२३ ते १७ जानेवारी २०२३ दरम्यान रंगणारा आहे. यामुळे कीर्ती कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह हा दिसून येत आहे.

अंतरंग फेस्टला मराठी मनोरंजनसृष्टीतील तारे-तारकांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच दि. १७ जानेवारी रोजी अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) आणि केतकी पालव (Ketki Palav) या दोघी फेस्टला हजेरी लावणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘अंतरंग’मध्ये विविध स्पर्धा या घेण्यात येणार आहे. परंतु या कार्यक्रमांसाठी कोणत्याही प्रकारच्या अटी ठेवण्यात आलेल्या नाहीत. प्रत्येक विद्यार्थी आपली आवडती कला हि आपल्या पद्धतीने व्यासपीठावर सादर करत आहेत. साहित्य, फाइन आर्ट्स, ललित कला या विभागांच्या अंतर्गत ३२ हून अधिक स्पर्धा पार परडणार आहेत. या फेस्टमध्ये सर्वोत्कृष्ट तीन कॉलेजांना ‘फिरते चषक’ मिळणार असून त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे हे चषक कॉलेज वर्तुळात चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. तसेच कीर्ती कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाने ‘अंतरंग’ हा फेस्टिव्हलमध्ये मज्जा मस्ती तर मोठ्या प्रमाणत होत आहे.

– चेतन घुगे, अध्यक्ष, अंतरंग फेस्टिव्हल, कीर्ती कॉलेज

यंदा हे फेस्टिवलचं चौथं वर्ष आहे. तब्ब्ल ३५० विद्यार्थ्यांची आमची टीम आहे, आणि सर्व टीम फेस्टिवलला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहे. या फेस्टिवलच्या प्रक्रियेतून मला खूप काही शिकायला मिळालं. मार्केटिंग, संभाषण कौशल्य, नेतृत्व अशा अनेक पातळीवर मी ‘अंतरंग’मुळे समृद्ध झालो आहे. आमचे प्रिन्सिपल डॉ. डी. व्ही. पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपाध्यक्ष तुषार चव्हाण व आर्यन शेंडेकर यांच्या सहकार्यानं यंदाचा फेस्टिवल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी आणि संपूर्ण टीम मेहनत घेत आहोत. तसेच हा संपूर्ण फेस्टिवल ४ वर्षांपूर्वी माजी विद्यार्थी ऋषी मोरे याने चालू केला होता. आणि अजूनही तो आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन हे करत असतो. त्याच्या सहकार्याने मी आणि टीम हा अंतरंग फेस्टिव्हल यशस्वी पार पडणार आहोत.

हे ही वाचा:

Nepal Yeti Airlines Plane Crash, लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वीच प्लेन झाले क्रॅश

Sharad Pawar Live : शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीचा सत्कार

Makar Sankranti 2023 , संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss