spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नौदलात अग्निवीर प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या

मुंबईमध्ये 'आयएनएस हमला' वर (INS Hamla) अग्निवीर प्रशिक्षणार्थी असलेल्या २० वर्षीय मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

मुंबईमध्ये ‘आयएनएस हमला’ वर (INS Hamla) अग्निवीर प्रशिक्षणार्थी असलेल्या २० वर्षीय मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. तिने खाजगी कारणामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज देण्यात आला आहे. अपर्णा नायर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत.

२७ नोव्हेंबर रोजी अपर्णा नायर हिने आत्महत्या केली. अपर्णाची अग्निवीर प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली होती. नौदलाच्या ‘आयएनएस हमला’ वर प्रशिक्षणासाठी दाखल झाली होती. लॉजिस्टिक विभागात तिची नियुक्ती करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णाचे कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. प्रेम संबंधांमध्ये दुरावा आला होता. त्या दुराव्यातून आलेल्या तणावातून तिने बेडशीटच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्यानंतर नौदलाच्या डॉक्टरांनी तपासणी केली. त्यानंतर तपासणी करून तिला मृत घोषित केले. या आत्महत्ये प्रकरणी मालवणी पोलीस तपास करत आहेत.

अपर्णा ही मूळची केरळमधील आहे. मागील १५ दिवसांपूर्वी ती प्रशिक्षणासाठी दाखल झाली होती, वसतिगृहातील खोलीत अर्पणाने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूरमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना घडली होती. नीट’ (NEET) ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने पीजी हॉस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. अथर्व सत्येंद्र श्रीवास्तव असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून अभ्यासाच्या दडपणातून त्याने हे टोकचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज देण्यात आला.

हे ही वाचा:

IPL साठी महेंद्रसिंग धोनी आला ऍक्शन मोडमध्ये, जिममधील फोटो तुफान व्हायरल

घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये गाजराचा हलवा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss