spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुनील तटकरे यांची भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा भाग झालाय, अजित पवार

सुनील तटकरे यांची ती भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा एक भाग झालेले आहे. त्यांच्या भाषणातून भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या कार्याचे कौतुक केले.

सुनील तटकरे यांची ती भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा एक भाग झालेले आहे. त्यांच्या भाषणातून भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या कार्याचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांच्या ‘अभिनंदन… अभिवादन’ या पुस्तकाचे प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडले त्यावेळी अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाचे कर्तृत्वाचे कौतुक केले.

तटकरे कोकणातील आहेत. कोकणातील लोकांना गोष्टी ऐकायला आणि सांगायला फार आवडतात. कोकणी माणसांचा गोष्टी वेल्हाळपणा तटकरे यांनी पुरेपूर उचलला आहे. विधीमंडळ किंवा विधीमंडळाच्या बाहेरची भाषणे ऐकल्यावर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व याची सगळ्यांना खात्री पटते. साहेबांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विधीमंडळातील भाषण ऐकले तर माझ्यासारख्या अनेकांच्या लक्षात आले की, त्यांच्या हातामध्ये कागदाची एक चिठ्ठी न घेता तासभर ओघवतं भाषण करण्याची त्यांची शैली आहे. पवारसाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले असेही अजित पवार म्हणाले.

 

लोकसभेचे खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी त्यांच्या मंत्री पदाच्या व आमदार पदाच्या काळात विधीमंडळात केलेल्या निवडक व अतिशय भावस्पर्शी भाषणांचे संकलन ‘अभिनंदन… अभिवादन’ या पुस्तकाच्यारुपाने प्रकाशन आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते होणार होते मात्र पवारसाहेबांच्या डोळ्यांचे ऑपरेशन असल्याने आज त्यांना ॲडमिट व्हायचे असल्याने ते उपस्थित राहू शकले शकले नाहीत. अभिनंदन… अभिवादन पुस्तकासाठी तटकरे यांचे अभिनंदन करण्याआधी या पुस्तकाची संकल्पना ज्यांना सुचली व प्रत्यक्षात आणली त्याचे कौतुक करतानाच अजित पवार यांनी त्यांना धन्यवाद दिले. सुनील तटकरे यांची भाषणे ही सगळीच अभ्यासपूर्ण व भावस्पर्शी अशाप्रकारची होती. त्यांच्या असंख्य भाषणातून मोजकीच भाषणे या पुस्तकात निवडण्याचे अवघड काम केले गेले आहे. तटकरे यांच्या चाहत्यांना या एका पुस्तकातून आपण न्याय देऊ शकू ती गोष्ट अशक्य आहे असेही अजित पवार म्हणाले. त्याग, अनुभव आणि वक्तृत्वशैली आहे म्हणून भाषणे चांगली होतात असे नाही तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल विचार मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल आपल्या मनात निष्ठा, कणव, कळवळा असला पाहिजे तरच भाषणे भावस्पर्शी होतात असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी म्हण आहे त्याप्रमाणे त्यांना लोकांची कामे करण्याची खोड लागली आहे. ते दिल्लीत असले तरी त्यांचे बारीक लक्ष रायगड जिल्ह्यातील गाव तालुका इथे असते. सुनील तटकरे यांना एकदा अपयश मिळाले तरी खचून न जाता ते पुढे जात राहिले आणि ते मंत्री, पक्षाचे प्रमुख नेते आहेत आता दिल्लीत खासदार म्हणून चांगल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. अलीकडचा अपवाद वगळता कोकणाला सातत्याने चांगले, अभ्यासू, विद्वान अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत त्यामध्ये आदरणीय मधु दंडवते, बॅ. नाथ पै, सुरेश प्रभू अंतुले यांच्या सारख्यांनी महाराष्ट्राचा कोकणचा गौरव राजधानी दिल्लीत वाढवला तेच काम आता सुनील तटकरे करत आहेत. महाराष्ट्राचा गौरव आणखी पुढे न्यावा वाढवावा अशा प्रकारची अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा : 

 

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss