spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवजयंतीनिमित्त सुषमा अंधारेंचं भावनिक पत्र, ‘महाराज आम्हाला माफ…

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या जयंतीनिम्मित राज्यभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच आज शिवनेरी किल्ल्यावर पर्यटन विभागाकडून शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या जयंतीनिम्मित राज्यभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच आज शिवनेरी किल्ल्यावर पर्यटन विभागाकडून शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. तर याच मुद्द्याला धरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. परंतु हा हल्लाबोल त्यांनी कोणाचेही नाव न घेता केला आहे. सुषमा अंधारे यांनी एक भावनिक पत्र लिहिले आहे. तर ‘फितुरांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला जात’ असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

सुषमा अंधारेंचं भावनिक पत्र!

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज,

आम्हाला माफ करा..
आज तुमच्या जन्मदिनी,
स्वतःला मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाद्याचं कातडं पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय..

तुमच्या हयातीत गद्दार ताठ मानेने फिरतोय,
असे कधीही घडले नाही…
पण ह्यापुढे पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही,
असे वचन आम्ही तुम्हाला देतो..

शिवश्रध्दा आणि शिवनिष्ठा मनी आहेच,
फक्त ह्या गनिमांशी लढण्याचे बळ द्या!
स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याची ऊर्जा द्या!
आणि ह्या अधर्मयुध्दात विजयी होण्याचा आशीर्वाद द्या!

हर हर महादेव !!

तुमचा खरा मावळा,
सच्चा शिवसैनिक.

हे ही वाचा : 

Shivjaynti 2023, शिवजन्मोत्सव सोहळ्यात पाळणा, साहसी खेळ आणि घोषणांनी दुमदुमला शिवनेरी परिसर

आज कोल्हापुरात अमित शाह काय बोलणार ? उत्सुकता शिगेला, मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते मंडळी राहणार उपस्थित

Shivjayanti 2023, शिवजयंती निम्मिताने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिवरायांच्या जन्मभूमी झाले नतमस्तक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss