spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Tata Mumbai Marathon, यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये महिला सरपंचही होणार सहभागी

नवीन वर्ष चालू झालं आहे. नवीन वर्षात अनेक संकल्प देखील अनेकांचे असतात. यंदा मुंबई टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) पार पडणार आहे.

नवीन वर्ष चालू झालं आहे. नवीन वर्षात अनेक संकल्प देखील अनेकांचे असतात. यंदा मुंबई टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) पार पडणार आहे. हे मॅरेथॉन मुंबईतील १५ जानेवारी २०२३ रोजी मुंबईमध्ये होणार आहे. या सर्व मॅरेथॉनमधील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे राज्यातील विविध गावांतील ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच देखील यामध्ये सहभागी होणार आहेत.

मुंबई मध्ये १५ जानेवारी २०२३ रोजी टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) पार पडणार आहे. या मॅरेथॉनमध्ये राज्यातील विविध गावांतील ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच सहभागी होणार आहेत. संपूर्ण राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमधून अनेक गावांमध्ये महिला या सरपंच पदासाठी निवडून आल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये विकासाठी आता महिला देखील त्यांचं नेतृत्व देणारा आहेत. आपल्यापल्या परीने मोलाचे योगदान देणार आहेत. मुंबई मॅरेथॉनच्या दृष्टीने ही एक अद्‌भूत अशी “ड्रीम रन” असणार हे मात्र नक्की आहे. गाव-खेड्यातील महिला ह्या देशाच्या आर्थिक राजधानीत विकासाचे स्वप्न घेऊन धावणार आहेत. गाव विकास प्रशिक्षण आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी झटणारी आरएससीडी आणि पायाभूत लोकशाही सक्षमीकरणासाठी (Grassroots Democracy Platform) प्रयत्न करणारी “ईशाद”(ISHAD) या स्वयंसेवी संस्थांच्या प्रोत्साहनातून महिला सरपंचांचे हे स्वप्न साकार होणार आहे. ग्रामपंचायतींच्या कारभाराचा सांभाळून खांद्यावर घेऊन आता या महिला पुढे जाणार आहेत. यावेळी स्थानिक विकासकामे, गरजा आणि निधीचा पारदर्शी उपयोग, या सर्व कामांमध्ये महिला सरपंच असताना यातून एक विरंगुळा म्हणून त्या टाटा मुंबई मॅरेथॉन या भव्य स्पर्धेतही सहभागी होतील. टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एकूण २० पंच सरपंच आणि नेतृत्वशील महिला धावणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबरोबरच महिलांना ५० टक्के आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना मिळाला बंदुकीचा परवाना

तारीख ठरली! संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन “या” तारखेला होणार, एवढे चालणार

Hockey World Cup 2023 आज होणार टीम इंडियाचा पहिला सामना, शाहरुखपासून विराटपर्यंत सर्वांनी दिल्या शुभेच्छा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss