प्रभादेवी रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा ठाकरे गट- शिंदे गट आमनेसामने, विकासकामांच्या उद्घाटनाच्या वेळी राडा

प्रभादेवी रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा ठाकरे गट- शिंदे गट आमनेसामने, विकासकामांच्या उद्घाटनाच्या वेळी राडा

मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्टेशन परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आला. विकासकामांच्या उदघाटन करताना श्रेयवादाच्या मुद्यावरुन दोन्ही गट समोरासमोर आल्याचं समोर येत आहे. ठाकरे गटाकडून यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. या भागातील विकासकामांचं उद्घाटन शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते होणार होतं. परंतु यावेळी तिथे ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करुन उद्घाटनाला विरोध करण्यात आला. यावेळी काहीशी तणावाची परिस्थिती त्याठिकाणी निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली

हेही वाचा :   

महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर मराठी मातीतील माणूस बसवा; संजय गायकवाड

एल्फिन्स्टन परिसरातील मुरलीधर सामंत मार्ग, फिटवला रोड फुटपाथ याच्या नुतनीकरणाचं हाती घेण्यात आलं होतं. या नुतनीकरणाच्या कामाचं उद्घाटन शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते होत होतं. तर याचवेळी ठाकरे गटाते कार्यकर्तेत्याठिकाणी पोहचले. हे काम ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केलं आहे. त्यांनीच या कामाचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे याचं श्रेय शिवसेनेच्या ठाकरे गटाला जातं, असा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. याबाबत अजय चौधरी यांना विचारलं असता ते म्हणाले की, याचं संपूर्ण काम मी केलं असताना शिंदे गटाकडून अशाप्रकारे उद्घाटन केलं जात असेल तर आम्ही विरोध करु. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट विकासकामांच्या नुतनीकरणाच्या उद्घाटनाच्या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकले.

सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप; संघाच्या शाखेतचं चुकीचा इतिहास शिकवला जातोय

गणेश विसर्जनाच्या वेळी दोन्हीही गट एकमेकांसमोर येऊन धिडले

गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आला मंच उभारला होता. या मंचावरुन शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. या वादाचे रुपांतर राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

Navale Bridge Accident : ब्रेक फेल नव्हे, तर ‘या’ कारणामुळे घडला नवले ब्रिजवर अपघात

Exit mobile version