spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Megablock: १५४ वर्ष जुना कर्नाक पुलाचे पाडकाम सुरू,२७ तासांचा महाब्लॉक लोकलसह एक्स्प्रेसही रद्द

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मशीद स्टेशन दरम्यानच्या कर्नाक उड्डाणपुलाच्या तोडकामासा काल शनिवारी रात्रीपासून सुरू झाले आहे. त्यामुळे रात्रीपासूनच २७ तासांचा मेगाब्लॉक सुरू करण्यात आला आहे. हा १५४ वर्ष जुना पूल धोकादायक ठरल्याने उड्डाणपुलाच्या तोडकामास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा आणि मेल-एक्स्प्रेस कोचिंग यार्डवर तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आलाय. त्यामुळे या काळात सीएसटीएमहून भायखळ्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि भायखळ्याहून सीएसटीएमकडे येणारी रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

 हेही वाचा : 

Twitter :ट्विटरवर ट्रम्पचे पुनरागमन; मतदानानंतर ट्रम्पना खाते पुन्हा सोपवण्यात आले

शनिवारी रात्रीच या कामाला सुरुवात झाली आहे. पुलावरील सर्व सिमेंट आणि डांबर हटवण्यात आले आहे. पुलाला ४ तुकड्यात कटिंग करण्यात येणार आहे. इंग्रज काळातील १५४ वर्षापेक्षा जुना कर्नाक पुलाला तोडण्यासाठी रेल्वे विभागाने २७ तासाचा मेगाब्लॉक केला आहे. हा मेगाब्लॉक सीएसएमटीकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर असणार आहे. ब्रीज तोडण्यासाठी मोठया विशालकाय क्रेन आणि oxigen आणि LPG सिलेंडरच्या सहाय्याने कटिंग केला जाणार आहे. सीएसएमटी ते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान कर्नाक पूल हा १९६८ मध्ये उभारण्यात आला होता. १५४ वर्ष झाल्यामुळे हा पूल धोकादायक ठरवण्यात आला होता.

CISCO : मेटा, अॅमेझॉन नंतर सिस्को करणार ५ टक्के कर्मचार्‍यांची कपात

ही रेल्वे सेवा चालू राहणार नाही

अप आणि डाउन हार्बर मार्ग: वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अप आणि डाउन धिम्या मार्गावर: भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अप आणि डाउन जलद मार्गावर: भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.

आज रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील. बृहन्मुंबई महानगर पालिकेला ब्लॉक प्रभावित भागात पुरेशा बसेस चालवण्याची विनंती केली आहे.

२७ तासांचा मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक लोकल गाड्या, एक्स्प्रेस गा्डया रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सीएसएमटीकडे येणाऱ्या काही एक्स्प्रेस ट्रेन पुणे, पनवेल आणि नाशिकपर्यंतच धावणार आहेत. त्याशिवाय काही ट्रेन पुणे, पनवेल आणि नाशिकमधून मार्गस्थ होतील.

लहानांपासून मोठ्यांना आवडेल असेल चॉकलेट सँडविच

Latest Posts

Don't Miss