spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज होणार ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची घोषणा, ‘या’ ठिकाणी करणार युतीची घोषणा

आजचा दिवस हा सर्व शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांची ९७ची जयंती आहे. जयंती निमित्त अनेक ठिकाणी आज दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. राज्यात आज शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची (Alliance of Shivashakti and Bhimshakti) घोषणा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला नवा भिडू मिळणार तर आहेच, परंतु, राज्यातील समाजकारण आणि राजकारण ऐंशी कोनात बदलून जाणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या युतीच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी या युतीची घोषणा होणार असल्याचं ट्विट केलं आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार, संयुक्त पत्रकार परिषद. २३ जानेवारी दुपारी १२.३० वाजता. आंबेडकर भवन, नायगाव (Naigaon), दादर… महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व… असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते म्हणाले की, “वंचित आणि शिवसेना युतीवर शिवसेनेकडून घोषणा होऊ शकते. यावर अजूनही दोन्हीकडून चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी या युतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेतलं पाहिजे असं मत मांडलं होतं. आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादीसोबतही जायला तयार आहोत. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलं आहे. सध्या वंचित आणि शिवसेना युती होईल. माझी युती ही शिवसेनेसोबत असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नंतर पाहून घेऊ.”

हे ही वाचा:

आजोबांची जयंती आदित्य ठाकरे विसरले, केली मोठी चूक

का साजरा करावा प्रजासत्ताक दिन? जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss