मुंबईकरांचा ‘श्वास’ गुदमरला !, हवेत प्रदूषणाची वाढ

गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा (Mumbai Air quality) बिघडल्याचे चित्र आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे.

मुंबईकरांचा ‘श्वास’ गुदमरला !, हवेत प्रदूषणाची वाढ

गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा (Mumbai Air quality) बिघडल्याचे चित्र आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. आता पुन्हा त्याच धोक्याच्या पातळीवर मुंबईची हवा आली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे वातावरणातील धूळ, धूर आणि धुक्याचे मिश्रण म्हणजेच धुरक्याचे प्रमाण वाढले असून हवेत तरंगणाऱ्या अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर) प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे दिल्लीसारखी मुंबईच्या हवेची अवस्था झाली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०९ असा नोंदवण्यात आला असून राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांनुसार (एनएएक्यूएस) हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ असल्याचे सूचक आहे.

प्रदुषणाची ही पातळी अचानक घसरण्यामागंच मुख्य कारण म्हणजे तापमानात झालेली घट आणि समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा कमी झालेला वेग हे आहे. यामुळं वाहनांमधून उत्सर्जित होणारा धूर आणि धूळ वातावरणात तसेच राहतात. त्यामुळं प्रदुषण वाढल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. साधारणत: हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुंबईची हवा सर्वात जास्त प्रदूषित असते. यंदा मात्र नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा पहिला आठवडा सर्वात प्रदूषित होता. ज्यात AQI ही गेल्या तीन-चार वर्षांपेक्षा जास्त होता. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तर मुंबईनं दिल्लीपेक्षा जास्त AQI नोंदवला होता.

वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. सध्या मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) २९३ -खराब आणि ३००-४०० ‘अत्यंत खराब’ पातळीच्या जवळ पोहोचली आहे. ज्यामुळं मुंबईकरांना श्वसनाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. मागील आठवड्यात, मुंबईतील हवेची पातळी २३२ आणि २७० च्या दरम्यान होती. त्यामुळं ती मध्यम पातळीवर घसरली होती. सध्या मुंबईचा AQI ‘खराब’ दर्शवण्यात आला असून पुढील दोन दिवस तो ‘खराब’च राहण्याची शक्यता आहे. असा अंदाज SAFAR च्यावतीनं सांगण्यात आला आहे. त्यामुळं सध्याच्या काळात खासकरून श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करणं फायद्याचं ठरेल.

मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या अतिखराब वर्गात पोहोचली आहे. वातावरणात पसरलेली धूळ आणि धुराचे कण यामुळं दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. या परिस्थितीमुळं मुंबईकरांना सध्या खोकला आणि घश्याचे त्रास जाणवू लागले आहेत. अशा परिस्थिती श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

हे ही वाचा : 

Parliament Winter Session आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

Datta Jayanti 2022 आज दत्त जयंती, देवी अनुसूयाच्या धर्माची परीक्षा कशी घेतली घ्या जाणून

Datta Jayanti 2022 दत्त जयंतीनिमित्त जाणून घ्या पूजा करण्याची पद्धत

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version