spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीच्या कट ऑफने ओलांडली नव्वदी..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल हा २ जून रोजी जाहीर केला .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल हा २ जून रोजी जाहीर केला. आणि महाराष्ट्र राज्याचा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थी उत्तमरीत्या यशस्वी झाले असून पुढील अकरावीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया देखील सुरु झाली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली. महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे मुंबई महानगर परिसरातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून मुंबई मधून १ लाख ३६ हजार २२९ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरी मधून प्रवेश देण्यात आले आहेत. मुंबईमध्ये जवळजवळ ५७ हजार ३२३ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीतच अकरावीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे.

अकरावीच्या अभ्यासक्रमासाठी मुंबईमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २ लाख ३६ हजार ५२० जागा उपलब्ध आहेत. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी २लाख १५ हजार ७५३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. मुंबईमधील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वाजिन्या शाखेत १ लाख २३ हजार ६२७ जागा उपलब्ध आहेत तर कला शाखेच्या एकूण ३२ हजार ६७८ जागा तर विज्ञान शाखेच्या ७६ हजार ८९७ जागा उपलब्ध आहेत. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या पसंतीस भरलेल्या ५७ हजार ३२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. २१ हजार ९३४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंती क्रमानुसार तर तिसऱ्या क्रमानुसार १५ हजार विध्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्याचबरोबर चौथ्या प्रसंती क्रमानुसार ११ हजार७२२, पाचव्या पसंती क्रमानुसार ९ हजार ३२०, सहाव्या पसंती क्रमानुसार ६ हजार ७४९, सातव्या पसंती क्रमानुसार ५ हजार १६८ ,आठव्या पसंती क्रमानुसार ३ हजार ८४३, नवव्या पसंती क्रमानुसार २ हजार ८८८, तर दहाव्या पसंती क्रमानुसार २ हजार २१९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

महत्वाची बाब म्हणजे यावर्षी पहिल्याच यादीचा कट ऑफ नव्वदी ला गेला आहे. मुंबई विद्यापीठांशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाची यादी सोमवारी जाहीर झाली. यावर्षी वाणिज्य शाखेच्या कट ऑफमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी क्रेंद्रिय बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी नव्वदी पार करत उत्तम गुण मिळवले आहेत. तसेच राज्य मंडळाच्या नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असून त्याचा परिणाम कटऑफवर झाला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे अश्या विद्यार्थ्यांना २७ जून पर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

हे ही वाचा:

Darshana Pawar हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस अखेर अटक

मुंबईमध्ये ईडीचे १५ ठिकाणी छापे, संजय राऊत यांच्या मित्रावर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss