spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘येथे’ रंगणार महाकाव्य रामायणाचा कार्यक्रम – Sudhir Mungantiwar

गेट वे ऑफ इंडिया येथे बुधवारी सायंकाळी ७ ते ९.३० या कालावधीत रामायण महाकाव्यातील प्रसंग जागविणारा कार्यक्रम होणार आहे. महाकाव्य रामायण या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना पुन्हा एकदा ग.दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि सुधीर फडके (Sudhir Phadke) यांच्या आवाजातून अजरामर झालेल्या गीत रामायणातील विविध प्रसंगांतील गीतांचे सादरीकरण पुन्हा एकदा नव्या कलाकारांच्या नृत्य (Dance), नाट्य (Drama), आणि वादनातून अनुभवता येणार असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.

देशभरासह विश्वातील नागरिकांच्या मनाला भावणाऱ्या महाकाव्य रामायणातील (Ramayana) विविध प्रसंगांचे प्रयोगात्मक कलेतून सादरीकरण असलेला आणि गीत, नृत्य, नाट्य, गायन, वादन यामधून रामायण महाकाव्यातील प्रसंग जागविणारा कार्यक्रम बुधवार, दि. ३१ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे सायंकाळी सात वाजता सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात दूरचित्रवाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या रामायण मालिकेतील काही कलाकारांचा सत्कारही करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.

या महाकाव्य रामायण सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar), सीतामाईच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत शुभंकर परांजपे हे सादरीकरण करणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असून त्यासाठीच्या सन्मानिका मुंबईतील विविध नाट्यगृहे, पु. ल. देशपांडे (P.L.Deshpande) महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी (Prabhadevi) यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालय तसेच मंत्रालयातील सांस्कृतिक कार्य विभाग येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

हे ही वाचा:

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss