१५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या दिवसांची सुट्टी आता होणार आनंददायी; Central Railway चालवणार १८ विशेष रेल्वे गाड्या!

१५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या दिवसांची सुट्टी आता होणार आनंददायी; Central Railway चालवणार १८ विशेष रेल्वे गाड्या!

१५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या पाच दिवसांची सुट्टी आता होणार आनंददायी कारण मध्यरेल्वे आता या दिवसांमध्ये १८ अतिरिक्त गाड्या सोडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई – नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष गाडी गुरुवार १५ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी १२.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. येताना १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून दुपारी १. ३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.

लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई – मडगाव विशेष :

लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई येथून गुरुवार १५ ऑगस्ट आणि शनिवार १७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. येताना मडगाव येथून शुक्रवार १६ ऑगस्ट आणि रविवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १२.४० वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव आणि कणकवली येथे थांबेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स  – कोल्हापूर विशेष : 

मंगळवर २० ऑगस्ट रोजी सकाळी १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई येथून सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स, कोल्हापूर येथे त्याच दिवशी दुपारी १. ३० वाजता पोहोचेल. रविवार १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स, कोल्हापूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १. ३० वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज येथे थांबेल.

पुणे – नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष :

गुरुवार १५ ऑगस्ट रोजी पुणे येथून संध्याकाळ ४. १० वाजता सुटेल आणि १७ ऑगस्ट रोजी नागपूर येथे ६.३० वाजता पोहोचेल. बुधवार १४ ऑगस्ट आणि शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून संध्याकाळी ७. ४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. हि गाडी उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.

कलबुर्गी – बेंगळुरू विशेष :

गुरुवार १५ ऑगस्ट रोजी आणि शनिवारी १७ ऑगस्ट रोजी रोजी कलबुर्गी येथून सकाळी ९. ३० वाजता सुटेल श्री एम विश्वैसरया टर्मिनल्स, बेंगळुरू येथे त्याच दिवशी २०.०० वाजता पोहोचेल. विशेष गाडी बुधवार १४ ऑगस्ट शुक्रवार १६ ऑगस्ट आणि गुरुवार १७ ऑगस्ट रोजी श्री एम विश्वैसरया टर्मिनल, बेंगळुरू येथून २१.१५ वाजता सुटेल आणि कलबुर्गी येथे ७.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी शाहबाद, वाडी, यादगिर, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनि, गुंटकल, अनंतपूर, धर्मवरम आणि यलहंका येथे थांबेल.

या सर्व गाडयांची तिकीट कशी काढायची ?

 

BJP, Mahayuti च्या विचाराला जनतेची नापसंदी, मराठवाड्यात परिवर्तनाची लाट: Nana Patole

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version