मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरचा मेगाब्लॉक आज दुपारी १ वाजता संपणार

हार्बर मार्गावर घेण्यात आलेला ३८ तासांचा मेगाब्लॉक सोमवारी दुपारी १ वाजता संपणार आहे.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरचा मेगाब्लॉक आज दुपारी १ वाजता संपणार

हार्बर मार्गावर घेण्यात आलेला ३८ तासांचा मेगाब्लॉक सोमवारी दुपारी १ वाजता संपणार आहे. या मेगाब्लॉक मध्ये बेलापूर (Belapur) आणि पनवेल (Panvel) स्थानकांमधील वाहतूक (सोमवारी) दुपारी एक वाजल्यापासून सुरु होणार आहे. ३८ तासांचा मेगाब्लॉक संपल्यानंतर पुढील पाच दिवस २ ते ६ ऑक्टोबर पर्यंत रात्री ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री घेण्यात येणाऱ्या ट्राफिक ब्लॉक मध्ये ट्रेन सुरळीत चालू असणार आहेत.

मालवाहतुकीसाठी असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आलं असून सोमवारी दुपारी १ वाजता पूर्ण होणार आहे. दुपारी १ वाजल्यानंतर हार्बर मार्गावरची वाहतूक सुरळीत होणार आहे. पनवेल येथे लोकल यार्डात स्टॅबलिंग मार्गिका क्रमांक १, २, ३, ४आणि १० च्या कामासाठी २ ते ६ ऑक्टोबरपर्यंत दररोज मध्यरात्री १२. ३० ते पहाटे ५. ३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

पहिली लोकल
ठाणे-पनेवल लोकल सकाळी ६. २० वाजता
पनवेल-सीएसएमटी लोकल पहाटे ५. ४० वाजता
पनेवल-ठाणे लोकल सकाळी६. १३ वाजता

शेवट लोकल
सीएसएमटी पनवेल रात्री १०. ५८ वाजता
ठाणे-पनेवल लोकल रात्री ११. ३२ वाजता
पनवेल-ठाणे लोकल रात्री १०. ५ वाजता

पनवेल दरम्यान मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले होते. याला २४ तासाहून अधिक काळ होऊन गेला. अजूनतरी कोकण रेल्वे मार्ग सुरळीत झालेले नाही. मुंबईतून कोकणात जाणारी एक लाईन सुरु झालीय विविध स्थानकात रखडलेल्या तुतारी एक्सप्रेस, मंगळूरु एक्सप्रेस, मडगाव एक्सप्रेस हळूहळू मार्गस्थ होत आहे. कोकणात जाणाऱ्या १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा: 

प्रकाश आंबेडकर यांनी केली शरद पवार गटावर टीका

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘ श्यामची आई ‘ चित्रपट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version