spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रवाशाने केले विमानाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल

विमानाच्या धक्कादायक घटना आपल्या कानावर येत असतात. परंतु लंडन ते मुंबई विमान प्रवासावेळी एअर इंडियाचे विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे.

विमानाच्या धक्कादायक घटना आपल्या कानावर येत असतात. परंतु लंडन ते मुंबई विमान प्रवासावेळी एअर इंडियाचे विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भारतीय अमेरिकन नागरिकाने विमानामध्ये धूम्रपान केले आणि इतर प्रवासांसोबत सोबत गैगैरवर्तन सुद्धा केले तसेच विमानाचा दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केलेला होता. या व्यक्तीवर आत्ता मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रवासी ३७ वर्षांचा आहे. या भारतीय अमेरिकन नागरिक आहे.फ्लाईटमधील बाथरूममध्ये जाऊन धूम्रपान आणि इतर प्रवाशांची गैरवर्तन प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आयपीसी कलम ३३६ आणि कलम २२, २३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एअर इंडियाच्या क्रू मेंबरने पोलिसांना सांगितले की, फाईटमध्ये धूम्रपान करण्यास मनाई आहे आणि जेव्हा तो व्यक्ती बाथरूम मध्ये जाऊन धूम्रपान करायला लागला तेव्हा अलार्म वाजायला लागला. आम्ही सर्व कर्मचारी बाथरूमच्या दिशेने धावलो आणि त्याच्या हातात सिगारेट असल्याचे पाहिले आणि आम्ही लगेच त्याच्या हातातून सिगारेट काढून घेतली. त्यानंतर त्या व्यक्तीने आमच्या सर्व क्रू मेंबर्सवर ओरडण्यास सुरवात केली. नंतरच्या आम्ही त्यांना सीट वर बसवले. काही वेळांनंतर आरोपी फ्लाइटच्या दरवाजाजवळ गेला आणि त्याने तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वागण्याने विमानामधील सर्व प्रवासी घाबरले.

सर्व प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता आम्ही त्याचे हात पाय बांधले आणि त्याला जागेवर बसवले. त्यानंतर तो व्यक्ती शांत बसला नाही त्या व्यक्तीने स्वतःचे डोके समोरच्या सीटवर आपटणे सुरुवात केली. त्यानंतर मग या फ्लाईटमध्ये कोणी डॉक्टर आहे का याची विचारणा ग्रुप मेंबर्सनी केली. त्यावर एक डॉक्टर असलेल्या व्यक्तीसमोर आली आणि त्यांनी आरोपीला तपासले. त्यावर आरोपीने सांगितले की त्याच्या बॅगमध्ये गोळी आहेत ती देण्यात यावी यावर त्याची बॅग तपासण्यात आली असता त्यात कोणतीही गोळी नव्हती त्यात फक्त एकही ई-सिगारेट सापडली. विमान उतरल्यावर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मूळचा भारतीय आहे परंतु अमेरिकेचा नागरिक आहे आणि त्याच्याकडे युएस पासपोर्ट आहे. आरोपीने हे कृत्य करताना तो मद्यधुंद अवस्थेत होता की मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होता हे शोधण्यासाठी त्याचे नमुना वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

ईडीच्या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना भावना झाल्या अनावर

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण? पोलिसांना सापडली औषधे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss