मेट्रोचा दुसरा टप्पा मुंबईकरांसाठी ठरला वरदान, आठ दिवसांत तब्बल १० लाख प्रवाशांनी केला प्रवास

मेट्रोचा दुसरा टप्पा मुंबईकरांसाठी ठरला वरदान, आठ दिवसांत तब्बल १० लाख प्रवाशांनी केला प्रवास

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मेट्रोचे लोकार्पण झाल्यावर २A आणि ७ चा प्रवास अगदी सुसाट चालला आहे. २० जानेवारीपासून सुरु झालेला मुंबईकरांचा हा प्रवास आतापर्यत १० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. १० लाख प्रवाश्यानी फक्त ८ दिवसात मेट्रोचा आनंद घेतला आहे. १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते उदघाटन झाले आणि दुसऱ्या दिवसापासूनच मुंबईकरांचा प्रवास सुरु करण्यात आला. नवीन सुरु झालेली मेट्रो लाईन २A डीएन नगर अंधेरी ते दहिसरपर्यत धावते. तर लाईन ७ दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वेपर्यत धावते. या दोन्ही मेट्रो लाईनचा एकत्रितपणे साधारण ३५ किमी वेगाने पल्ला पार करतात. YouTube video player आरे ते धनुकरवाडी या दरम्यानचा टप्पा हा गेल्या वर्षी खुला करण्यात आला होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मेट्रोचे पहिल्या उद्घाटन झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत १० लाख प्रवाश्यांनी जलद गतीने प्रवास केला आहे. मेट्रोमार्ग २A आणि ७ हा पश्चिम मुंबई उपनगरात राहणाऱ्या लोकांसाठी वरदान आहे. पंतप्रधानांनी उद्घाटन केल्यानंतर आठवड्याभरात १० लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी मेट्रोमध्ये प्रवास केला आहे. आता या दोन्ही मेट्रोचे मार्ग पूर्णपणे खुले झाले आहेत. त्यामुळे मेट्रो १ सोबत जोडले गेले आहेत आणि मुंबई महानगरमधले पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग सहज रेल्वे मार्गाशी जोडले जात आहे. आणि त्या मुळे मुंबईकरांना मेट्रोचा फायदा झाला आहे. मेट्रो २A आणि ७ चा २ दुसऱ्या टप्प्याच्या उद्घटनासोबतच ‘मुंबई वन कार्ड’ लाँच करण्यात आले. मेट्रो ने प्रवास करणारे प्रवासी हे कार्ड घेऊन भारतामध्ये कोणत्याही प्रदेशामध्ये प्रवास करू शकतो. या कार्डचे अनेक फायदे आहेत त्यामध्ये आपण हे कार्ड घेऊन मेट्रो बेस्ट बसची तिकिटे खरेदी करू आक्तोवणी त्या बरोबर च आपण शॉपिंग सुद्धा करू शकतो. या कार्ड मध्ये १०० ते १००० पर्यत आपण रिचार्ज करू शकतो. हे कार्ड आपण ट्रेनमध्ये तसेच बसमध्ये वापरू शकतो. २०१५ मध्ये या दोन्ही मेट्रोची पायाभरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं याच्या हस्ते केली होती.

हे ही वाचा:

मुंबईमध्ये मोठी दुर्घटना टाळली, क्रेनची लोकलला धडक

युजरच्या टीकेला कंगनाने दिले चोख उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version