spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Share Market Opening Bell आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात ३०५ हून अधिक अंकांनी घसरण

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात ३०५ हून अधिक अंकांनी घसरण झाली आहे, तर निफ्टी ९५ अंकांची घसरला झाली आहे. मागील आठवड्याभरापासून शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. शुक्रवारी शेअर बाजारात घसरण कायम होती. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ३०५ अंकाच्या घसरणीसह ६२,५३५ वर सुरू झाला तर निफ्टी ९५ अंकाच्या घसरणीसह १८,६०० वर सुरू झाला. आज सुरवातीच्या सत्रात ३९ शेअर्समध्ये तेजी तर ९ शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

हेही वाचा : 

वर्षाचा अखेर मनोरंजनात्मक, ‘गोविंदा नाम मेरा’ ते ‘सर्कस’; डिसेंबरमध्ये चित्रपटांची मोठी मेजवानी

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतही विक्रीचा जोर दिसून येत आहे. निफ्टी ५० मधील १० कंपन्यांचे शेअर दर तेजीत दिसत असून ४० कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टीत हिंदाल्कोमध्ये २.५९ टक्के, टाटा स्टीलमध्ये १.७० टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, जेएसडब्लू स्टीलमध्ये १. १२ टक्के, इंडसइंड बँकेत ०.६३ टक्के, आयशर मोर्टसमध्ये०.४८ टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात २.६१ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. एसबीआय लाइफच्या शेअर दरात १.५५ टक्के, टाटा मोटर्समध्ये १.५३ टक्के, ब्रिटानियामध्ये १.४१ टक्के आणि रिलायन्सच्या शेअर दरात १.१२ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

Gujrat Election पंतप्रधान मोदी व अमित शहा आज मतदानाचा हक्क बजावणार, ९३ जागांवर आठशेच्यावर उमेदवार नशीब आजमावणार

आजचे टॉप १० शेअर्स

आयशर मोटर्स (EICHERMOT)

टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

डिक्सन (DIXON)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

झिंदाल स्टील (JINDALSTEL)

उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकरांची आज पुन्हा भेट होणार, युतीचा निर्णयावर शिक्कामोर्तब?

Latest Posts

Don't Miss