मॅनहोलमध्ये पडल्यामुळे दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईत कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शिवाजी नगर, गोवंडी येथील ड्रेनेज लेन जाम झाल्याने सफाई करण्यासाठी, शिवाजी नगरमध्ये दोन मजुर आले होते त्यांचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मॅनहोलमध्ये पडल्यामुळे दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईत कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शिवाजी नगर, गोवंडी येथील ड्रेनेज लेन जाम झाल्याने सफाई करण्यासाठी, शिवाजी नगरमध्ये दोन मजुर आले होते त्यांचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे मजूर कॉन्ट्रॅक्ट (contract) वर कामे घेणारे मजूर होते. गोवंडीमधील शिवाजी नगर येथील ९० फूट रोड क्रमांक १० वर शनिवारी साधारण दुपारी ४च्या सुमारास साफसफाईचे काम करत असताना भूमिगत नाल्याच्या मॅनहोलमध्ये हे दोन कंत्राटी मजूर पडले. मॅनहोलमध्ये पडल्याने या कंत्राटी मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, असे बीएमसीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मुंबईत कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शिवाजी नगर, गोवंडी येथील ड्रेनेज लेन (drainage lene) जाम झाल्याने सफाई करण्यासाठी दोन कामगार उतरले होते. या दुर्घटनेची माहिती इतर कामगारांनी दिल्यावर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून मॅनहोलमधून दोघांनाही बाहेर काढले. यामधील एकाचे नाव रामकृष्ण (वय २५) आणि दुसऱ्याचे नाव सुधीर दास (वय ३०) अशी या मजुरांची नावे आहेत. त्यांना बाहेर काढल्यावर राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण राजावाडी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बीएमसी (BMC)अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या दोन कंत्राटी मजुरांना ज्ञान कन्स्ट्रक्शन कंपनीने कामावर ठेवले होते. ही कंपनी ६०० मिमी-व्यासाची सीवर लाइन बांधत असून कंपनीने आतापर्यंत सीवर लाइन बीएमसीला (BMC) सुपूर्द केलेली नाही.

या दोन्ही मजुरांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृत्यू विजेच्या शॉकमुळे की पाण्यात दुबल्याने की गुदमरून झाला हे अजून तरी स्पष्ट झाले नाही. यासाठी पोस्टमार्टम (post mortem) रिपोर्टची वाट पाहावी लागेल असे सांगण्यात आले. जेव्हा इतर मजुरांच्या काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी या दोन मजुरांना बघितलं आणि त्यांना बाहेर काढलं ”, असं बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे .

बीएमसीच्या (BMC) एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, कंत्राटदाराने निविदा अटींप्रमाणे सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना नमूद केल्या आहेत. याप्रकरणी आता बीएमसीने (BMC) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल आयपीसी कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

अल-हकीम मशिदीला भेट देण्यापासून ते अल-सिसीला भेटण्यापर्यंत, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version