लोकलमध्ये विद्यार्थीनीवर अत्याचाराचा प्रकार संतापजनक…, अजित पवारांनी केला संताप व्यक्त

संपूर्ण मुंबईला हादरून देणारी ए बातमी नुकतीच समोर आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई सारख्या भल्या मोठ्या शहरात एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लोकलमध्ये विद्यार्थीनीवर अत्याचाराचा प्रकार संतापजनक…, अजित पवारांनी केला संताप व्यक्त

संपूर्ण मुंबईला हादरून देणारी ए बातमी नुकतीच समोर आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई सारख्या भल्या मोठ्या शहरात एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ ही उडाली आहे. रोज रात्री अपरात्री लोकल ट्रेन मधून महिला या प्रवास करत असतात. परंतु आता या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. आणि या गोष्टीमुळे सर्वत्र खळबळ ही उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया हि दिली आहे.

मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान या घटनेचा युध्दपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना घडली. परीक्षेला जात असताना विद्यार्थीनीसोबत सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. ही घटना घडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती ? याला कोण जबाबदार आहे ? सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थीनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता असेही अजित पवार म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे ?

चालत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान सकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी वाजता ही भीषण घटना घडली. प्राप्त माहितीनुसार पीडित तरुणी एकटीच प्रवास करत होती, तिने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी नवी मुंबईतील बेलापूर येथे एका परीक्षेला बसणार होती. बुधवारी सकाळी ही मुलगी सीएसएमटी येथे हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये चढली. ट्रेनने हालचाल सुरू करताच, त्या वेळी रिकाम्या असलेल्या महिलांच्या डब्यात एक माणूस घुसला. सकाळी ७:२६ च्या सुमारास सीएसएमटी आणि मस्जिद स्थानकांदरम्यान महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीने अलार्म वाजवल्यावर तो मस्जिद स्टेशनवर (CSMT नंतरचे स्थानक) खाली उतरला आणि तो पळून गेला. मुलीने जीआरपीकडे जाऊन तक्रार दाखल केली, त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.

हे ही वाचा:

अजित पवारांनी साधला शिंदे सरकारवर निशाणा

लाच घेणारे तीन पोलीस हवालदार निलंबित!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version