मेट्रो – ३ चे काम पहिल्या टप्यात वेगाने सुरु

बहुप्रतीक्षित मुंबईतील भूमिगत मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरु आहे. सध्या मेट्रो ३ चे काम वेगाने सुरु असताना बघायला मिळत आहे.

मेट्रो – ३ चे काम पहिल्या टप्यात वेगाने सुरु

बहुप्रतीक्षित मुंबईतील भूमिगत मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरु आहे. सध्या मेट्रो ३ चे काम वेगाने सुरु असताना बघायला मिळत आहे. त्यातच आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो ३ चे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये ३३.५ किमी लांबीची हि मार्गिका दोन टप्यात वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे . त्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्यात बीकेसी ते आरेदरम्य डिसेंबर २०२३ मध्ये तर दुसऱ्या दट्यात बिकेसी ते कफ परेड दरम्यान जून २०२४ मध्ये वाहतूक सेवा सुरु करण्यात येईल असा मानस एम एम आर सीकडून करण्यात येत आहे. ही संपूर्ण भूमिगत मेट्रोसेवा जून २०२४पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा मुंबई मेट्रोचा प्रयत्न असेल असे सांगण्यात येत आहे.

सध्या एकीकडे वेगाने काम सुरु आहेच तर दुसरीकडे मेट्रो गाड्या मुंबईत आणून त्याची चाचणी घेण्याच्या कामालाही सुरुवात झालेली आहे. त्यानुसार दोन मेट्रो गाड्या गुरुवारी श्री सिटीवरून आरे कारशेडमध्ये दाखल झाली आहे. त्याचबरोबर भविष्यात कुलाबा – वांद्रे स्पीझ मेट्रो -३ मार्गावर धावणारी चौथी आणि पाचवी मेट्रो गाडी आंध्रप्रदेशातील श्री सिटीमधून आरेकरशेडमध्ये दाखल झाली आहे. मुंबईमध्ये दाखल झालेल्या मेट्रो गाड्यनाची संख्या पाच वर पोहोचली आहे. तसेच पहिल्या टप्यात आरे ते वांद्रे कुर्ला संकुलदरम्यान एकूण नऊ गाड्यांची आवश्यकता आहे. आता सध्या स्थितीला पाच गाड्या सज्ज आहेत. तर अजून चार गाड्यांचे येणे बाकी आहे.

तर येणाऱ्या काळात नव्या दाखलझालेल्या गाड्यांची चाचणी सुरु होणार असून पहिल्या टप्यातही नऊ गाड्यांची आवश्यकता आहे यामधील पाच गाडया या दाखल साल्या असून बाकी उरलेल्या चार गाड्या लवकरच येतील आणि पहिला टप्पा हा डिसेंबर मध्ये वाहतूक सेवेत दाखल होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

Odisha मध्ये अधिकाऱ्याच्या घरावर छापा, शेजाऱ्याच्या छतावर फेकले…

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version