spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमात शिरले चोरटे, ५ लाखांचे दागिने चोरीला

धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचा कार्यक्रम मुंबईमध्ये होत आहे अश्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्यामुळे ते बऱ्याच दिवसापासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचा कार्यक्रम मुंबईमध्ये होत आहे अश्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्यामुळे ते बऱ्याच दिवसापासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. बागेश्वर बाबांचा (Bageshwar Baba) कार्यक्रम मुंबईमध्ये होऊ नये यासाठी काँग्रेस, मनसेसह अनेक पक्षांनी विरोध दर्शवला. त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून एक आव्हानही देण्यात आले होते. त्यानंतर त्या बाबांचा मुंबईमधील मीरारोड परिसरामध्ये त्यांचा दरबार भरवण्यात आला होता. परंतु पहिल्याच दिवशी दरबारामध्ये आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि दागिन्यांची चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत. अनेक पक्षांनी विरोध केल्यामुळे बाबाचा दरबार हा वादग्रस्त ठरला होता आता या घटनेमुळे आणखी वादग्रस्त बनला आहे.

बागेश्वर बाबांचा १८ आणि १९ मार्च रोजी मीरारोड परिसरामध्ये हा दरबार भरवण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी जमली होती. त्यामध्ये महिलांची संख्या जास्त होती. १८ मार्च सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रम सुरु झाला होता आणि रात्री ९.३० ला संपला. परंतु या गर्दीमध्ये चोरटयांनी आपले हात साफ केले. महिलांच्या अंगावरील दागिन्यांची चोरी झाली आहे सुमारे ५ लाख रुपयांपर्यत दागिने चोरटयांनी चोरले आहेत. त्यामध्ये मंगळसूत्र, सोन्याच्या साखळ्या ही चोरीला गेल्या आहेत. तेथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यत ३६ महिलांचे मंगळसूत्र आणि चैन चोरीला गेले आहेत.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकूण ४ लाख ८७ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी सध्या काही जणांची पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरु आहे. बागेश्वर बाबांचा हा कार्यक्रम अधिक वादग्रस्त झाला आहे. कोणीही अंधश्रद्धेला बळी पडू नये. परंतु आपल्याला कोणालाही पुरावे देण्याची गरज नाही ज्यांना माझ्यापासून समस्या आहेत त्यांनी येऊन पुरावा घ्यावे. ज्यांना गरज असेल त्यांनी यावे आम्ही मलम लावू, पॅरासिटॅमॉलची गोळी देऊ असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी विरोध करणाऱ्यांना म्हटले आहे. त्यांनी पहिले माझ्या भक्तांचा सामना करा संपूर्ण देश आमचा आहे. आम्ही लोकांना शिक्षित करत आहोत समानतेशी जोडत आहोत. भारतामधील मंत्र आणि भारतामधील ऋषी मुनीमध्ये किती ताकत आहे हे आम्ही त्यांना सांगणार आहोत असे ते म्हणाले.

हे ही वाचा :

Poco X5 5G चे भारतात पदार्पण, फीचर्स पाहून व्हाल आनंदाने वेडे

कुठल्याही परिस्थिती शेतकऱ्यांना…, तारांकित प्रश्नांद्वारे छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी

Sameer Khakhar यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी दु:खद निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss