मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, मुंबईत १९९३ पेक्षाही मोठा धमाका करणार

मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, मुंबईत १९९३ पेक्षाही मोठा धमाका करणार

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर (Mumbai) हल्ला होणार असे धमक्यांचे अनेकदा फोन येऊन गेले आहेत. आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. १९९३ च्या धर्तीवर मुंबईत ठिकठिकाणी बॉम्बस्फोट (bomb blasts in Mumbai) होणार असल्याचे अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितले आहे. यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) खात्यातील सगळ्याच यंत्रणा हडबडून जाग्या झाल्या आहेत. या फोन प्रकरणी मालाडमधून (Malad) एकाला अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यात मुंबईत १९९३ सारखे स्फोट होणार, असं या फोन कॉल मधून सांगण्यात आलं आहे.

फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, शहरात दंगल घडवण्यासाठी इतर राज्यातून बऱ्याच लोकांना बोलावण्यात आले आहे. या फोननंतर मुंबई पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाला (Anti Terrorism Squad) याबाबत माहिती देण्यात आली. या माहितीनंतर मुंबई एटीएसकडून (Mumbai ATS) कारवाई केली आहे. माहीम, भेंडी बाजार, नागपाडामध्ये बॉम्बस्फोट होणार (Bomb blast will happen in Nagpada
) असल्याचा दावा या फोन कॉलमधून करण्यात आला आहे. तर बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही या फोनच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. मुंबई एटीएसने तपास करत एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मुंबईतील अनेक भागात बॉम्बस्फोट झाल्याची माहिती फोनवरून मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएसची टीमही सक्रिय झाली. एटीएसने एकाला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एटीएसने आरोपीला मुंबईतील मालाड भागातील पठाणवाडी येथून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. फोनवरून अशी धमकी का देण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएस आरोपींना पुढील चौकशीसाठी आझाद मैदान पोलिसांच्या (Azad Maidan Police) ताब्यात देणार असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान सुद्धा जनतेतून निवडा, अजित पवारांची मागणी

आम्ही जमिनीवर चालणारे लोक,हवेत कोण आहे याची त्यांनी तपासणी करावी, फडणवीसांच पवारांना प्रतिउत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version