NIA ला ई-मेलद्वारे मुंबईवर हल्ला करण्याची धमकी

मुंबईवर हल्ला (Mumbai Attack) करण्याची धमकी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) ई-मेलवरुन (Email) देण्यात आली आहे. या मेल मुले सर्वत्र खळबळ उडाली आहे.

NIA ला ई-मेलद्वारे मुंबईवर हल्ला करण्याची धमकी

मुंबईवर हल्ला (Mumbai Attack) करण्याची धमकी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) ई-मेलवरुन (Email) देण्यात आली आहे. या मेल मुले सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचंही या मेलद्वारे सांगण्यात आले आहे. एनआयएने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली असून पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली आहे.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला (NIA) एका अज्ञात व्यक्तीकडून तालिबानी सदस्य असल्याचा दावा करणारा एक मेल आला आहे. ज्याने मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली आहे, असे पोलिस सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने मुंबई पोलिसांना या घडामोडीची माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. “धमकीचा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला तालिबानी असल्याचे सांगितले. मुंबईत दहशतवादी हल्ला होणार असल्याचे त्याने सांगितले,” असे मुंबई पोलिस सूत्रांनी सांगितले.धमकीचा मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांसह एनआयएने सत्य बाहेर काढण्यासाठी संयुक्त तपास सुरू केला.

या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला, मंगळवारी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये धमकीचा कॉल आला होता. ज्यामध्ये अज्ञात कॉलरने शाळा उडवून देण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या लँडलाईनवर दुपारी ४. ३० वाजता फोन आला. फोन करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब पेरल्याचा दावा केला होता. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबई पोलिसांना एका अनोळखी कॉलरचा ‘संशयास्पद’ कॉल आला होता. त्याने माहिती दिली होती की शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉलरकडून शहरात इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर तीन बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा आला होता. मुंबई पोलिसांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. अज्ञात फोन करणाऱ्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ई-मेल आयडीवर हा मेल आला आहे. मेलमध्ये मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ज्या व्यक्तीने ईमेल केला आहे त्या व्यक्तीने तालिबानी असल्याचा दावा देखील केला आहे. त्यामुळे आता पोलीस आणि इतर तपास यंत्रणा याचा तपास करत आहे. मेल कोणी पाठवला? नेमका मेल कुठून आला आहे, याचा शोध तपास यंत्रणा करत आहेत. मुंबईसह देशातील इतर शहरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Budget 2023 , ‘भारत प्रथम, नागरिक प्रथम’ हा विचार घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे नेणार, नरेंद्र मोदी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version