तीन अतिरेकी मुंबई दाखल, पोलिसांचा अधिक तपास सुरु

मुंबईमध्ये तीन अतिरेकी आल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. या तिघांचा पाकिस्तानी असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे.

तीन अतिरेकी मुंबई दाखल, पोलिसांचा अधिक तपास सुरु

मुंबईमध्ये तीन अतिरेकी आल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. या तिघांचा पाकिस्तानी असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे. राजा ठेंगे नावाच्या व्यक्तीने हि माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून दिली आहे. त्याने यापैकी एक व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबरही पोलिसांना दिला आहे.संशयी तीनही व्यक्तींचा बेकायदेशीर व्यवसाय असल्याची माहिती राजा ठेंगे यांनी दिली आहे आणि यापैकी एकाचे नाव मुजीब सय्यद असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

या आधारावर पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. दुबईवरून शुक्रवारी पहाटे ते तीन अतिरेकी भारतामध्ये आले असल्याचे राजा ठेंगे यांनी सांगितले आहे. तसेच त्यांचा पाकिस्तान संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अधिक माहिती लवकरच…..

Exit mobile version