वरळीत तीन आमदार मात्र झिरो विकास! Shrikant Shinde यांची उबाठावर घणाघाती टीका

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि मंत्री इथले आमदार असून देखील वरळीकरांना विकासापासून उपेक्षित ठेवले, आता विधानसभेला जनता त्यांना कायमचे घरी बसवेल, अशी घणाघाती टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात वरळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वरळीत तीन आमदार मात्र झिरो विकास! Shrikant Shinde यांची उबाठावर घणाघाती टीका

तीन आमदार, एक खासदार, माजी मंत्री, महापौर इतके लोकप्रतिनिधी वरळी मतदार संघात असून देखील त्यांच्या काळात वरळीचा झिरो विकास झाला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि मंत्री इथले आमदार असून देखील वरळीकरांना विकासापासून उपेक्षित ठेवले, आता विधानसभेला जनता त्यांना कायमचे घरी बसवेल, अशी घणाघाती टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात वरळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आज दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबई मतदार संघातील शिवडी, भायखळा, वरळी, विक्रोळी आणि भांडूप या पाच विधानसभा मतदार संघाच्या बैठका झाल्या. वरळीबाबत सविस्तर बैठक झाली. वरळीकरांचे प्रश्न, कोळीवाड्याचा प्रश्न, बीडीडी चाळ, पोलिस वसाहतींचा पुनर्विकास, एसआरए, सेस इमारतींचे प्रश्न याबाबत मुख्यमंत्र्यांकडे लवकरच बैठक घेऊ, असे ते म्हणाले. कोळी बांधवांचा स्पॅन वाइड करण्याचा प्रश्न आधीच्या सरकारने आणि लोकप्रतिनिधीने होणार नाही, असे सांगितले होते. मात्र सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावला. कोळी बांधवांना त्याचा फायदा झाला, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

वरळीमध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी शिवसेना सज्ज आहे. पुढचा आमदार धनुष्यबाणावरच निवडून येईल, असा विश्वास असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीवेळी कल्याण, ठाणे अशा मतदार संघात लढण्याचे खुले आव्हान देणारे त्यावेळी पळून गेले. तोंडाच्या वाफा घालवण्यापेक्षा मैदानात येऊन लढून दाखवा असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

धारावीतील मशिदीबाबत राजकारण करणारे तिरुपती मंदीरातील लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळली, त्यावर बोलताना कसे विसरले, एखाद्या मंदिरावर हातोडा पडत असताना त्यांची तोंडं का उघडत नाहीत, असा खरमरीत सवाल खासदार डॉ. शिंदे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ज्यांची मते मिळाली त्या समाजाशी संबधित वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक जेव्हा संसदेत आले तेव्हा त्यांचे खासदार पळून गेले. 2019 बाळासाहेबांचे हिंदूत्व सोडले आणि हिंदूंशी गद्दारी केली. ते फक्त व्होट बँक पॉलिटिक्स करत असून आता 2024 मध्ये मुस्लिमांशी गद्दारी करतील, अशी घणाघाती टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. ते पुढे म्हणाले की, धारावीतील मशिदप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला आहे. सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Devendra Fadnavis on Koli Bhavan: आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूने खंबीरपणे उभे, Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

नवी मुंबईतील कोळी भवनाचे CM Shinde यांच्या हस्ते भूमीपूजन, कोळी भवनाला निधी कमी पडू देणार नसल्याचे केले आश्वासन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version