विश्वसेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करणे गरजेचे- Kiren Rijiju

विश्वसेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करणे गरजेचे- Kiren Rijiju

केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाद्वारे ‘बुद्धांचा मध्यममार्ग – जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शक’ (The Buddha’s Middle Way – A Guide to Global Leadership) या विषयावर मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे विशेष परिषद आयोजित करण्यात आली होती. बौद्ध धर्म हा कर्मावर आधारित आहे. या धर्मात हिंसा नावाची कुठलीही गोष्ट नसून भगवान बुद्ध यांनी जगाला अहिंसा, दया, करुणा हा संदेश दिला आहे. विश्व सेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी केले.

बुद्ध यांचा मध्यम मार्ग वैश्विक नेतृत्वासाठी मार्गदर्शक (The Buddha’s Middle Way Guide to Universal Leadership) या विषयावरील ही परिषद महाराष्ट्रासारख्या पवित्र भूमीत होत असल्याचे सांगून केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) जगातील सुंदर असे संविधान भारत देशाला दिले आहे. या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. महाराष्ट्रात अल्पसंख्याक व बौद्ध धर्मासाठी (Minorities and Buddhism) काम करणाऱ्या संस्थांनी शासनाच्या मदतीने राज्यातील प्रत्येक प्रादेशिक विभागात संविधान सभागृह तयार करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच अल्पसंख्याक समुदायासाठी अभ्यास केंद्र, नोकरी करणाऱ्या महिला व विद्यार्थींनीसाठी वसतिगृह उभारणीकरता प्रयत्न करावे, असे आवाहनही केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी यावेळी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगतात या परिषदेच्या आयोजनाची भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा (Iqbal Singh Lalpura), दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे (Dr. Milind Kambale), डॉ. दामेंडा पोरजे यांच्यासह भिक्खू व अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version