spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वरळीमध्ये इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून मोठा दगड कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबईतील वरळी परिसरात एक मोठी दुर्घटना ही झाली आहे. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन दगड पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील वरळी परिसरात एक मोठी दुर्घटना ही झाली आहे. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन दगड पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या (Building) ४२ व्या मजल्यावरून बांधकामासाठी वापरला जाणारा मोठा दगड खाली पडून हा अपघात घडला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अपघाताच्या घटना या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नुकताच वरळी परिसरात अपघात झाल्याची घरत्न हि समोर आली आहे. वार्लीमध्ये एका इमारतीचे बांधकाम हे सुरु होते. त्यावेळेस तिथे एक मोठा दगड हा खाली पडला. एका वाहनावर हा दगड पडून दोघाजणांचा मृत्यू यात झाला आहे. याबाबतची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) वतीनं देण्यात आली आहे. साबीर अली (वय ३६) आणि इम्रान अली खान (वय ३०) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. अपघातत मृत्यू झालेले दोघेही रस्त्यावरून जात होते. त्यावेळी अचानक इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरुन दगड खाली कोसळला. यात ते दोघेही जखमी झाले होते. दुर्घटनेनंतर बराच वेळ हे दोघेही गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच या परिसरातील अनेक वाहनांवर देखील दगड पडल्याची घटना देखील घडली आहे.

तसेच दि. ९ जानेवारी रोजी मुंबईतील वरळी परिसरात लिफ्टला अपघात झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना वरळीच्या अवघना टॉवर परिसरात घडली होती. या ठिकाणी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या लिफ्टचा अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या परिसरात आता अपघाताची दुसरी घटना घडली आहे.

हे ही वाचा : 

BBC च्या दिल्ली कार्यालयावरील आयकर विभागाच्या धाडीवर ब्रिटन सरकारने दिली प्रतिक्रिया

Mahashivratri 2023, महाशिवरात्रनिमित्त बनवा स्पेशल थंडाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss