spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करणारे मुंबईतील दोन तरुण अटकेत…

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिनाची स्टोरी इंस्टाग्रामवर ठेवल्यामुळे मुंबईतील २ तरुणांना अटक करण्यात आली आहे . या तरुणांवर मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवणयात आला आहे.

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिनाची स्टोरी इंस्टाग्रामवर ठेवल्यामुळे मुंबईतील २ तरुणांना अटक करण्यात आली आहे . या तरुणांवर मुंबई तील कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवणयात आला आहे. गुन्हा नोंदवण्यात आलेले दोन्ही तरुण १९ वर्षीय महाविद्यालयीन विदयार्थी आहेत. तरुणांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा स्वतंत्र दिनाची स्टोरी कुलाबा मार्केटमधील दोन तरुणांनी ठेवली आहे . त्यामुळे धार्मिक तिढा निर्माण होऊ शकते असे याची तक्रार कुलाबा मार्केटमधील एक तरुण व्यापारी प्रथमेश चव्हाण याने पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवत सांगितली होती. त्यानंतर कुलाबा पोलीस स्टेशन चा ATS पथकाने सोमवारी रात्री कुलाबा मार्केट मधून त्या दोन तरुणांना शोधून त्याना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आणलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचे मोबाईल फोन जप्त करून त्यांनी ठेवलेल्या इंस्टाग्राम स्टोरी चेक केल्या कारण त्या दोन तरुणांनी खरोखरच पाकिस्तानचा स्वतंत्र दिनाची स्टोरी ठेवली आहे का ते चेक केले. तेव्हा मुलांनी खरोखरच ते फोटो ठेवले होते. त्या इंस्टग्राम स्टोरीचे पोलिसांनी स्क्रीन शॉट घेऊन ठेवले आहेत.यावरून असे दिसून येते कि त्या तरुणांनाचा भारताचा स्वातंत्र्य दिनाचा दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा हेतू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नंतर कुलाबा पोलिसांनी त्या दोन तरुणांवर सीरपीसी कलम १५१ (३) अन्व्ये अटकेची कारवाई करण्यात आली आणि त्याना न्यायलयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी घडलेल्या सर्व गुह्यची माहिती त्याचा कुटुंबायांना दिली आहे. त्यानंतर त्याचा वर योग्यती कारवाई करून त्या दोन्ही तरुणांना समजावून सोडून देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

IND vs WI 4th T-20 – टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचे आव्हान

प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss