Uddhav Thackeray – Raj Thackeray आता तरी एकत्र या…, शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी

सर्व राजकीय नाट्यानंतर आता एकीकडे सामान्य नागरिकांकडून अनेक प्रतिक्रिया तर येतच आहेत तर दुसरीकडे शिवसेना भवनाबाहेर तुफान बॅनरबाजी ही करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray – Raj Thackeray आता तरी एकत्र या…, शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी

काल दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर राज्यात पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व राजकीय नाट्यानंतर आता एकीकडे सामान्य नागरिकांकडून अनेक प्रतिक्रिया तर येतच आहेत तर दुसरीकडे शिवसेना भवनाबाहेर तुफान बॅनरबाजी ही करण्यात आली आहे.

शिवसेना भावनाबाहेर लावण्यात आलेल्या या बॅनर वर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला….राज ठाकरे – उद्धव ठाकरे आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे असा आशय या बॅनर वर लिहिण्यात आला आहे. सध्या शिवनसेना भवन परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरची तुफान चर्चा चालू आहे. त्यामुळे आता पुढे राजकीय वर्तुळात आणखी नवीन काय घडामोडी घडतील हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरेल.

हे ही वाचा:

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version