मुंबईत केव्हा धो धो पाऊस बरसणार यासंदर्भात अपडेट

गरम्याने हैराण झालेले मुंबईकर अजून देखील पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जून महिना संपत आला मात्र तरी सुद्धा पावसाची एन्ट्री अजून काही झालेली नाही.

मुंबईत केव्हा धो धो पाऊस बरसणार यासंदर्भात अपडेट

गरम्याने हैराण झालेले मुंबईकर अजून देखील पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जून महिना संपत आला मात्र तरी सुद्धा पावसाची एन्ट्री अजून काही झालेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना दररोज प्रकोपाचा सामना करावा लागतोय. उन्हाच्या तडाख्यामुळे शरीराची लाहीलाही होतेय. तसेच पावसाळा लांबल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचीही टांगती तलवार आहे. या दरम्यान आयएमडीने मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. आयएमडीने मुंबईत पावसाची एन्ट्री केव्हा होणार हेच सांगितलंय. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय.

हवामान विभागाने आज गुरुवार २२ जून रोजी पाऊस केव्हा होणार याबाबतची अपडेट दिली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनसुार, मुंबईत २३ ते २५ जून दरम्यान मान्सूनची एन्ट्री होणार आहे. हवामान विभागाच्या अपडेटमुळे आता लवकरच मुंबईकराची उकाड्यापासून सुटका होणार आहे.साधारणपणे मान्सूनची २५ जूनपर्यंत गुजरातमध्ये एन्ट्री झालेली असते. मात्र यावेळेस मान्सूनचा लेटमार्क लागला. मान्सूनला विलंबाचं कारण बिपरजॉय चक्रीवादळ सांगितलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला काही हवामान तज्ज्ञांनुसार मुंबईकरांना आणखी काही दिवस मान्सूनची प्रतिक्षा करावी लागू शकते. मान्सूनची मुंबईत २३ ते २५ जूनजूनदरम्यान एन्ट्री होऊ शकते, असं या हवामान तज्ज्ञांचं मत आहे.

मान्सूनच्या लेटमार्कमुळे मुंबईत पावसाच्या कमतरतेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत १ ते २१ जून दरम्यान सांताक्रूझ वेधशाळेत जवळपास ३२७. २ मिमी पावसाची नोंद केली जाते. मात्र यंदा १७.९ मिमी इतकाच पाऊस झाला आहे. पाऊस कमी असल्याचा फटका हा तापमानावर झालाय. सध्याचं तापमान हे साधारण तापमानापेक्षा अधिक आहे. गुरुवारी मुंबईचं कमाल तापमान हे ३४.३अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, जे सामन्य तापमानाच्या तुलनेत 3 डिग्रीने अधिक आहे.

हे ही वाचा:

साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘Leo’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसीय अमेरिका दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version