वंदे भारत एक्सप्रेस हे महाराष्ट्र आणि मुंबईसाठी मोठ यशस्वी पाऊल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वंदे भारत एक्सप्रेस हे महाराष्ट्र आणि मुंबईसाठी मोठ यशस्वी पाऊल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दि १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येणार या पार्श्ववभूमीवर संपूर्ण मुंबई अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाला संबोधित केल होत. त्याच बरोबर राज्याचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितलं की “मला या गोष्टीचा आनंद आहे की या दोन्ही वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यासाठी भारताचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. यासाठी मी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानतो” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितल की “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यासाठी स्वतः उपस्थित राहिले या करता मी त्यांचे मन पासून आभार मानतो, मागच्या आठवड्या जो ग्लोबल सर्वे झाला त्यामध्ये देशातच नाही तर पूर्ण जगात आपले पंतप्रधान पहिल्या क्रमांकावर आहेत. हे आपल्या सर्व देशवासियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता आज इथे दोन वंदे भारत ट्रेन सुटणार आहेत. या एक्सप्रेस शिर्डी आणि सोलापूरला जाणार हे महाराष्ट्र आणि मुंबईसाठी मोठा यशस्वी पाऊल असेल.हे लोकांसाठी फायदेशीर आहे. जसेकी रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र आणि देशातील रेल्वेच जे नेटवर आहे हे सर्वात मोठं नेटवर म्हणजे रेल विभाग आहे”. असे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे म्हणाले की “गरिबातील गरीब नागरिक रेल्वेचा वापर करतो. रेल्वे विभागाकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील ८-९ वर्षांच्या कार्यकाळात यात बदल झाला. गरिबातील गरिब लोक रेल्वेचा वापर करतात. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरदूत करण्यात आली”. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : 

राजकारण्यांची धडधड वाढली, निवडणुका लांबणीवर | Maharashtra Politics | PM Narendra Modi | BMC Election

राजकारण्यांची धडधड वाढली, निवडणुका लांबणीवर | Maharashtra Politics | PM Narendra Modi | BMC Election

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version