spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले विविध महत्त्वाचे निर्णय, विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार कि.मी. रस्ते व पुलाची कामे, ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यासोबतच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना दरमहा १८ हजार रुपये मिळणार आहेत. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली असून आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार असा निर्णय पक्का झाला असून राज्यातील कमी विकसित भागांना यामुळे फायदा होणार आहे. सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच्यावतीने करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार, गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहेत. औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामध्ये ५० टक्के मुद्रांक शुल्क सवलत दिली जाणार आहे. भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय उभारण्याचे बैठकीत सांगण्यात आले.

हे ही वाचा:

Valentines Day निमित्ताने Hardik Pandya पत्नीला दिल्या शुभेच्छा!, तर नताशा राहते करोडोंच्या घरात…

मलायका आणि  रितेश देशमुखने ठाण्यातील व्हायरल व्हिडिओवर व्यक्त केला संताप,मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss