spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने?

राज्यात आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यात रंगणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. आता राज ठाकरे  (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. असे चित्र असताना आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारी करण्याची सुरुवात केली आहे.

मुंबईत मनसे पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. त्यात वरळी मतदारसंघात मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) निवडणुकीत उभे राहण्याची चिन्ह असताना आता काही महिन्यांपासून संदीप देशपांडे यांचा वरळी मतदारसंघातील वावर वाढला आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘व्हिजन वरळी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मनसेनं या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीयांसह स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मनसेच्या व्हिजन वरळी या कार्यक्रमात आदित्य ठाकरे हजेरी लावणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. माझं व्हिजन, तुमचं व्हिजन, आपलं व्हिजन, व्हिजन वरळी (Vision Worli) या कार्यक्रमाचा उ‌द्घाटन समारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवार २१ सप्टेंबर २०२४, जांबोरी मैदान, वरळी येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी वरळीतील नागरीकांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच समस्या तुमची, उत्तरं मनसेची! अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे.

यामध्ये नागरिकांच्या समस्या, समस्येवर तोडगा आणि जनसंवाद घेतला जाणार आहे. मत मागायला नाही तर मत जाणून घ्यायला आलोय असं कॅम्पेन वरळीत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून काही महिन्यांपासून करण्यात आलं होतं. त्यामध्ये अनेक नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या होत्या त्यांच्या तक्रारी सांगितल्या होत्या. या तक्रारी तसेच समस्यांवर रिसर्च करून त्यावर काय तोडगा निघू शकतो असा रिपोर्ट तयार करून तो व्हिजन वरळीच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. मनसेची स्थापना महाराष्ट्राचं व्हिजन डोक्यात ठेवून राज ठाकरेंनी केली होती. वरळी विधानसभेत पहिल्यांदाच असा आगळावेगळा कार्यक्रम मनसेच्या माध्यमातून होतोय असं मनसे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी सांगितले. दरम्यान, ‘व्हिजन वरळी’ या कार्यक्रमासाठी सर्व पक्षातील नागरिकांनी वरळीच्या विकासासाठी काही सूचना असतील, काही गोष्टी सांगायच्या असतील तर सर्वांनी यावे. आम्ही सर्व पक्षाच्या नागरिकांना लोकांना बोलवत आहोत. यात कुठलेही मतभेद नाहीत. हा प्रश्न नागरिकांच्या विषयांचा आहे त्यामुळे सर्वांनी यावे. यासोबतच, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनाही आम्ही आमंत्रण दिलं आहे, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टाईम महाराष्ट्राशी बोलताना सांगितले.

हे ही वाचा:

PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

चैत्यभूमीवर जाऊन महामानव आंबेडकरांच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा..Naresh Mhaske यांचं Rahul Gandhi यांना पत्र

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss